- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
water-hyacinth-in-morna-river: मोर्णा नदीतील जलकुंभी काढण्याचे काम युध्द पातळीवर सुरू; जिल्हाधिकारी यांनी केली पाहणी
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
भारतीय अलंकार न्यूज 24
नीलिमा शिंगणे जगड
अकोला: शहराच्या मध्य भागातून वाहणारी मोर्णा नदी पात्रात मोठ्या प्रमाणात जलकुंभी साचल्यामुळे अकोला महानगरपालिका प्रशासनाव्दारा मोर्णा नदीतील जलकुंभी काढण्याचे काम युध्द पातळीवर करण्यात येत असून सदरचे काम शेवटच्या टप्प्यात आहे.
आज दि. 14 मे रोजी जिल्हाधिकारी, प्रभारी मनपा आयुक्त तथा प्रशासक अजित कुंभार यांच्याव्दारे मोर्णा नदीतील जलकुंभी काढण्याच्या कामाची पाहणी करण्यात आली आहे. यावेळी जिल्हाधिकारी यांनी मनपा उपायुक्त गीता ठाकरे यांच्या कडून मोर्णा नदीतील जलकुंभी काढण्याच्या कामाचा आढावा घेतला.
अकोला महानगरपालिका क्षेत्रातील एकुण 4.3 कि.मी. म्हणजे अकोली ते रेलवे पुलापर्यंत जलकुंभी होती. त्यामधून आजपर्यंत अकोली ते आर पी टी एस रोड, रमा बाई आंबेडकर नगर पर्यंत म्हणजे 3.6 कि.मी.पर्यंत नदीतील जलकुंभी काढण्याचे कार्य पुर्ण झाले असून पुढील 4 ते 5 दिवासात काम पुर्ण होतील, अशी माहिती मनपा उपायुक्त गीता ठाकरे यांनी यावेळी दिली आहे.
मोर्णा नदीतील काढलेली जलकुंभी हे नदी काठावरून उचलून भोड येथील बायोगॅस प्रकल्पावर तातडीने पोहचवावी. तसेच नदी पात्रात जलकुंभी होऊ नये, यासाठीची उपाययोजना तातडीने करण्यात यावी आणि नदी पात्रात किंवा नदी काठी नागरिकांव्दारे निर्माल्य किंवा ईतर कोणत्याही प्रकारचा कचरा टाकण्यात येऊ नये यासाठीच्या उपाययोजना तातडीने करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी यावेळी दिली आहे. यावर मनपा उपायुक्त यांनी स्वच्छता निरीक्षकांना मोर्णा नदीत पुन्हा जलकुंभी आढळून आल्यास ती तातडीने काढणे तसेच नदी पात्रात किंवा नदी काठी निर्माल्य किंवा कचरा टाकणा-यांवर प्रतिबंध लावणे साठी ज्या स्वच्छता निरीक्षकाच्या कार्यक्षेत्रात जो नदीचा पात्र येईल ते संपुर्णपणे स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी संबंधीत स्वच्छता निरीक्षकांवर निश्चित करण्यात आली आहे.
यावेळी मनपा उपायुक्त गीता ठाकरे, जनसंपर्क अधिकारी भरत शर्मा, स्वच्छता निरीक्षक सचिन आखरे, आकाश निंदाने व ईतर कर्मचा-यांची उपस्थिती होती.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा