theft-case-bhartiya-house-akl: भरतीया यांच्या निवासस्थानी चोरी प्रकरण: अहमदनगर येथून आरोपी ताब्यात; हिस्सेवाटणी करुन सर्व आरोपी झाले मार्गस्थ




भारतीय अलंकार न्यूज 24

ॲड.नीलिमा शिंगणे जगड 

अकोला: गोरक्षण मार्गावरील रहिवासी उद्योगपती भरतीया यांच्या बंगल्यात चोरी करणाऱ्या एका आरोपीला अकोला पोलिसांनी अहमदनगर येथून आज ताब्यात घेतले. या आरोपीने चोरीचा मुद्देमालाची हिस्सेवाटणी होवून सर्व आरोपी आपापल्या दिशेने मार्गस्थ झाल्याची कबूली दिली आहे. स्थानिक गुन्हे शाखा अकोला यांना 48 तासात आरोपीला अटक करण्यात यश मिळाले आहे.


4 मे रोजी  खदान पोलीस स्टेशन येथील अपराध क्रमांक 385/24 कलम 457, 380 भा.दं.वि प्रमाणे गुन्हा दाखल असुन तपासावर आहे.  गुन्हयातील घरफोडी मध्ये सोने, चांदी तसेच रोख असा एकुण 43,77,317 रूपयाची चोरी झाली होती. गुन्हयाच्या घटनास्थळी पोलीस अधिक्षक अकोला, अप्पर पोलिस अधिक्षक अकोला, व उपविभागीय पालिस अधिकारी, शहर विभाग अकोला व पो. नि. शंकर शेळके, स्थानिक गुन्हे शाखा, अकोला व स्था.गु.शा. येथील पो. स्टाफ यांनी भेट दिली. यावेळी पोलिस अधिक्षक  अकोला यांनी लेखी व तोंडी आदेश देवुन सदर गुन्हयात उघडकीस आणने कामी आदेशीत करून सुचना दिल्यावरून स्थानिक गुन्हे शाखा, अकोला यांचे पथक तयार करून आरोपीचा शोध घेण्यास सांगीतले. 





त्याअनुषंगाने पो. नि. शंकर शेळके, पोउपनि आशिष शिंदे व स्था.गु.शा. येथील यांचे पथकातील पोलीस अंमलदार यांनी घटनास्थळाचे आजुबाजुचा परिसराची पाहणी केली. परिस्थितीजन्य पुराव्यावरून गोपनिय माहितीचे आधारे अहमदनगर जिल्हयातुन जिगर कमलाकर पिंपळे (वय 37 वर्ष रा. पाखोरा, ता. गंगापुर, जि. संभाजी नगर) यास ताब्यात घेतले. 



आरोपीने दिली कबुली


आतापर्यंत केलेल्या चौकशी दरम्यान आरोपीने गुन्हा केल्याची कबुली दिली आहे. सदर गुन्हयातील आरोपीतांनी चोरी केलेल्या मुददेमालाची आपसात हिस्से वाटे हे घटनेच्या दिवशी करून वेगवेगळया मार्गाने निघुन गेल्याचे अटक असलेल्या आरोपी याने सांगीतले.


यांनी केली कारवाई 


सदरची कार्यवाही पोलीस अधिक्षक  बच्चन सिंह ,अपर पोलीस अधिक्षक, अभय डोंगरे यांचे मार्गदर्शनाखाली पो. नि. शंकर शेळके, स्थानिक गुन्हे शाखा, अकोला. पोउपनि. आशिष शिंदे, ए.एस.आय. दशरथ बोरकर तसेच फिरोज खान, अब्दुल माजीद, खुशाल नेमाडे, महेंद्र मलिये, अविनाश पाचपोर, वसीमोद्दीन, गोकुळ चव्हाण, भास्कर धोत्रे, सुलतान पठाण प्रमोद डोईफोडे, उमेश पराये, रविंद्र खंडारे अभिषेक पाठक, धिरज वानखडे, स्वप्नील खेडकर, स्वप्नील चौधरी, उदय शुक्ला, एजाज अहमद, लिलाधर खंडारे, अन्सार अहमद, मोहम्मद आमीर, राहूल गायकवाड सर्व (स्था.गु.शा. अकोला) तसेच सायबर सेलचे आशिष आमले, गोपाल ठोंबरे व चालक प्रशांत कमलाकर, चालक विजय कबले, प्रविण कश्यप यांनी केली.

टिप्पण्या