summer-swim-training-camp: उन्हाळी जलतरण प्रशिक्षण शिबिरात बाल शिबिरार्थींचा गौरव




भारतीय अलंकार न्यूज 24

अकोला: जय श्रीराम ग्रुपच्या वतीने वसंत देसाई येथील तरण तलावावर सुरू असलेल्या बालक जलतरण प्रशिक्षण शिबिराचा समारोपापूर्वी कौतुक सोहळा आयोजित केला होता. यावेळी सर्व बाल शिबिरार्थींचे कौतूक म्हणून त्यांचा गौरव करण्यात आला.


यंदा शाळांना सुट्ट्या सुरू झाल्यापासून पोहण शिकण्यासाठी मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी येथे प्रवेश घेतला. गत वर्षांपासून यंदाची उपस्थिती ही लक्षणीय होती. यंदाच्या शिबिरात 5 वर्षांपासून ते 60 वर्षांपर्यंतचे विद्यार्थी दिसून आले. यामुळेच पोहण्याप्रती लहान मुलांची आवड अधिक वाढली असल्याचं दिसून आलं. लहान मुलांचा उत्साह वाढवावा आणि त्यांना पोहण्याप्रती आवड निर्माण व्हावी याकरिता दरवर्षी श्रीराम ग्रुप आणि मास्टर पॉवर स्विमिंग तर्फे शिबिरात येणाऱ्या मुलांसाठी मनोरंजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात येतो.





रविवारी पार पडलेल्या कार्यक्रमात बच्चे कंपनीला खाऊ देवून भेटवस्तू  देण्यात आल्या. श्री राम ग्रुपचे पवन केडिया यांनी यावेळी पोहण्याचे महत्व उपस्थितांना पटवून दिलं. प्रत्येकाला पोहण आलं पाहिजे, असे त्यांनी सांगितले.




या उपक्रमासाठी श्रीराम ग्रुपचे सदस्य ॲड. राधेश्याम मोदी, पवन केडीया, डॉ. राजेश काटे, नंदु बुलबुले , संतोष तोष्णीवाल, हेमेन्द्र राजगुरू , दिनेश गोडा, दीपक मायी सोबतच मास्टर पॉवरचे गोपाल पाटील , सुशील कांबळे , प्रमोद खंडारे , दीपक सदांशिव आणि स्टाफ अथक परिश्रम घेततात. 




 


कार्यक्रमाला नरेंद्र राठी, नरेंद्र तापडीया, डॉ. रवींद्र चौधरी, डॉ. मधुसूदन बगडीया, डॉ. के. के. अग्रवाल, डॉ.केडीया, डॉ.किरण लढ्ढा , मनोज बोधाणी , गोपाल चौधरी, दिलीप जैन, अरुणकुमार सिन्हा , राजेश परमार , ॲड. मनमोहन सारडा, अरुण बजाज , रेखचंद भन्साली समवेत विद्यार्थी आणि त्यांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पण्या