road-accident-patur-ghaat-akl: पातूर घाटातील दुधानी फाट्या जवळ दोन कारमध्ये धडक; अपघातात तीन ठार, एक महिला व दोन युवकांचा समावेश





भारतीय अलंकार न्यूज 24

ॲड. नीलिमा शिंगणे जगड 

अकोला:  जिल्ह्यातील पातूर घाटातील दुधानी फाट्या जवळ दोन चारचाकी वाहनाचा आज दुपारी भीषण अपघात घडला. यात तीन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असल्याचे समोर येत आहे. तर दोन गंभीर जखमी असल्याचे कळते.



दोन्ही वाहनांची अमोरसमोर धडक झाल्याने हा अपघात झाला. यापैकी एक गाडी अमरावती शिक्षक मतदार संघाचे आमदार ॲड. किरण सरनाईक यांची आहे. मात्र सुदैवाने शिक्षक आमदार या गाडीत प्रवास करत नव्हते. तर दुसरी गाडी निलेश इंगळे यांची असल्याची प्राथमिक माहिती आहे. 





चारपदरी असलेल्या या अकोला वाशिम मार्गावर काही ठिकाणी रस्त्याचे काम सुरू आहे. त्यामुळे काही ठिकाणी वाहतूक एकाच रस्त्यावर वळविण्यात आली. त्यामुळेच हा अपघात घडल्याची शक्यता वर्तविली जात आहे. 





मिळालेल्या माहितीनुसार मृतांमध्ये एक महिला आणि दोन युवकांचा समावेश आहे. दोन्ही युवक अकोल्याचे तर महिला वाशिम जिल्ह्यातील असल्याची प्राथमिक माहिती मिळाली. मृतांची नावे अद्यापही कळू शकलेली नाही. पोलीस घटनास्थळी पोहचली असून पुढील तपास करीत आहे.


टिप्पण्या