maharashtra-day-celebrate-akl: शास्त्री क्रीडांगणावर निनादले ‘ गर्जा महाराष्ट्र माझा ’चे सूर; महाराष्ट्र दिन मंगलमय वातावरणात साजरा




भारतीय अलंकार न्यूज 24

नीलिमा शिंगणे जगड 

अकोला: विविध दलांचे शानदार पथसंचलन, राष्ट्रगीत व राज्यगीत ‘जय जय महाराष्ट्र माझा’ चे आसमंतात निनादणारे सूर अशा उत्साहपूर्ण व मंगलमय वातावरणात लालबहादूर शास्त्री क्रीडांगणावर आज महाराष्ट्र दिन साजरा करण्यात आला. 


प्रारंभी जिल्हाधिकारी अजित कुंभार यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. यावेळी राष्ट्रगीत व राज्यगीताचे सादरीकरण आणि राष्ट्रध्वजाला सलामी देण्यात आली. तसेच संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी प्राण अर्पण करणा-या हुतात्म्यांना अभिवादन करण्यात आले.  कार्यक्रमाला जिल्हा परिषद अध्यक्ष संगीता अढाऊ, मुख्य कार्यकारी अधिकारी बी. वैष्णवी, पोलीस अधीक्षक बच्चन सिंह, उपजिल्हा निवडणूक अधिकारी महेश परंडेकर, निवासी उपजिल्हाधिकारी विजय पाटील, अनिल माचेवाड, जिल्हा नियोजन अधिकारी गिरीश शास्त्री, जिल्हा माहितीविज्ञान अधिकारी अनिल चिंचोले आदी मान्यवर उपस्थित होते.

राष्ट्रसेवेसाठी प्राणांची बाजी लावणा-या व शौर्य गाजविणा-या महाराष्ट्राच्या वीर सुपुत्रांचे कुटुंबिय, वीरमाता, वीरपत्नी सोहळ्याला उपस्थित होत्या. यावेळी जिल्हाधिकारी श्री. कुंभार यांनी त्यांची भेट घेऊन संवाद साधला व शुभेच्छा दिल्या.  



जिल्हाधिकारी यांनी उघड्या जीपमधून मैदानाला फेरी मारून पथकांचे निरीक्षण केले. त्यानंतर जिल्हा पोलीस दल, पोलीस प्रशिक्षण केंद्र, महिला पोलीस, गृहरक्षक दल, अग्निशमन दल आदी पथकांनी शानदार पथसंचलन केले. परेड कमांडर गणेश जुमनाके, सेकंड परेड कमांडर गोविंद साबळे, पीएसआय संदीप बलोदे, निता दामधर, चतरसिंग सोळंके, विजयसिंग डाबेराव व नीलेश गाडगे आदींनी विविध पथकांचे नेतृत्व केले.


पोलीस अधिकारी व कर्मचा-यांचा गौरव




पोलीस महासंचालकांकडून सन्मानचिन्ह प्राप्त पोलीस अधिकारी व कर्मचा-यांचा गौरव यावेळी जिल्हाधिका-यांच्या हस्ते करण्यात आला. पोलीस निरीक्षक शंकर शेळके, सुनील पवार, काझी मोहम्मद फजलुर रहेमान,  विनय जाधव, अनिल टोपकर, सतीश फोकमारे, ज्ञानेश्वर सैरिसे, अ. फईम शेख चांद, सुनील राऊत, मंगेश महल्ले, विलास बंकावार, साजिद खालिक अब्दुल आदींना यावेळी गौरविण्यात आले. आदर्श तलाठी पुरस्कार प्राप्त रवीशंकर पाली यांचाही गौरव झाला. नीलेश गाडगे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.





जिल्हाधिकारी कार्यालयात महाराष्ट्रदिन साजरा


महाराष्ट्र दिन निमित्त ध्वजारोहण सोहळा जिल्हाधिकारी कार्यालयात आज झाला. जिल्हाधिकारी अजित कुंभार यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले.


यावेळी राष्ट्रगीत, राज्यगीत व राष्ट्रध्वजाला सलामी देण्यात आली, तसेच संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी आपले प्राण अर्पण करणा-या हुतात्म्यांना अभिवादन करण्यात आले. त्यानंतर जिल्हाधिकारी श्री. कुंभार यांनी सर्व अधिकारी व कर्मचा-यांना महाराष्ट्रदिनाच्या शुभेच्छा दिल्या. उपजिल्हा निवडणूक अधिकारी महेश परंडेकर, निवासी उपजिल्हाधिकारी विजय पाटील, अनिल माचेवाड, जिल्हा नियोजन अधिकारी गिरीश शास्त्री, जिल्हा माहितीविज्ञान अधिकारी अनिल चिंचोले, माहितीविज्ञान अधिकारी श्रीनिधी वाजपेयी, समन्वय अधिकारी गजानन महल्ले आदी यावेळी उपस्थित होते. 



जिल्हाधिकारी निवासस्थानी ध्वजारोहण



जिल्हाधिकारी यांच्या निवासस्थानी महाराष्ट्र दिनानिमित्त जिल्हाधिकारी अजित कुंभार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी राष्ट्रगीत, राज्यगीत व राष्ट्रध्वजाला वंदन करण्यात आले. संयुक्त महाराष्ट्रासाठी प्राण त्यागणा-या हुतात्म्यांना अभिवादन करण्यात आले. 



बालकांना मिठाईचे वाटप 


डॉ. जुईली अजित कुंभार, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी गिरीश पुसदकर, बालसंरक्षण अधिकारी सुनील लाडुलकर, जिल्हाधिका-यांचे स्वीय सहायक गजानन गवई, मोहन साठे, डॉ. विनय दांदळे, गायत्री बालिकाश्रम, शासकीय बालगृह, उत्कर्ष शिशुगृह, सूर्योदय बालगृह येथील बालके, पोलीस कर्मचारी आदी उपस्थित होते. 



टिप्पण्या