Lok-sabha-election-mh-2024: तिसऱ्या टप्प्यातील मतदान: राज्यात अकरा मतदार संघात सरासरी 53.40 टक्के मतदान; धाराशिव मध्ये राडा




भारतीय अलंकार न्यूज 24

मुंबई, दि. 7 : राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान सुरू असून अकरा मतदार संघात सायंकाळी 5 वाजेपर्यंत सरासरी  53.40 टक्के मतदान झाले आहे.

तिसऱ्या टप्प्यातील एकूण 11 लोकसभा मतदारसंघनिहाय मतदानाची टक्केवारी पुढीलप्रमाणे :-

लातूर – 55.38 टक्के

सांगली – 52.56 टक्के

बारामती – 45.68 टक्के

हातकणंगले – 62.18 टक्के

कोल्हापूर –  63.71टक्के

माढा – 50.00  टक्के

उस्मानाबाद –  52.78 टक्के

रायगड – 50.31 टक्के

रत्नागिरी -सिंधुदूर्ग-  53.75 टक्के

सातारा –  54.11 टक्के

सोलापूर – 49.17   टक्के





तिसऱ्या टप्प्यातील एकूण अकरा मतदार संघात 11 सकाळी 9 वाजेपर्यंत सरासरी 18.18 टक्के मतदान झाले. तर दुपारी 1 वाजेपर्यंत सरासरी 31.55 टक्के मतदान झाले.  दुपारी 3 वाजेपर्यंत  सरासरी  42.63 टक्के मतदान करण्यात आले.




निवडणुकीला गालबोट 


धाराशिवमध्ये मतदान सुरू असताना भूम येथे शिंदे विरुद्ध ठाकरे गटाचे कार्यकर्ते आमने-सामने आल्यानंतर वाद झाला. वाद एवढा टोकाला गेला की, यामध्ये ठाकरे गटाच्या एका कार्यकर्त्याच्या मृत्यू झाला. समाधान पाटील असे मृत कार्यकर्त्याचे नाव आहे.  ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांवर 20-22 कार्यकर्त्यांनी हल्ला केला. यामध्ये ठाकरे गटाचे तीन ते चार कार्यकर्ते जखमीही झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेनंतर काही वेळ मतदान थांबवण्यात आले होते. पण नंतर पुन्हा मतदान केंद्रावर मतदान सुरळीत करण्यात आले.  या प्रकरणातील हल्लेखोरांनी घटनास्थळावरुन पळ काढल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.


कार्यकर्त्यांमध्ये राडा

हातकणगंले येथेही मतदान केंद्रावर कार्यकर्त्यांमध्ये राडा झाल्याची बातमी समोर आली आहे. धैर्यशील माने आणि सत्यजीत पाटलांच्या कार्यकर्त्यांमध्ये साखराळे मतदान केंद्रावर वाद झाला. यानंतर पोलिसांनी मध्यस्थी करत कार्यकर्त्यांना बाजूला केले.


Evm जाळल्याची घटना 

सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यातील बागलवाडी येथे शांतपणे मतदान प्रक्रिया सुरू होती. अशात एका मतदाराने ईव्हीएम मशीनवर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला. यामुळे ईव्हीएम मशीनचे थोडे नुकसान झालं आहे. या घटनेनंतर बागलवाडी येथे काही काळ मतदान प्रक्रिया शांत झाली होती. यानंतर नवीन ईव्हीएम मशीन आणून मतदानाला सुरुवात झाली. बागलवाडी मतदान केंद्रावर पोलिसांचा मोठा बंदोबस्त करण्यात आला होता.




महाराष्ट्रात आज (07 मे) बारामती, कोल्हापूर, लातूर, माढा, रत्नागिरी सिंधुदुर्ग, सोलापूर, उस्मानाबाद, रायगड, सांगली, सातारा आणि हातकणंगले येथे मतदान पार पडले आहे. यानंतर महाराष्ट्रातील 48 मतदारसंघातील पाचव्या टप्प्यात 20 मे रोजी 13 जागांवर मतदान होणार आहे. मतदानाचा निकाल 4 जून रोजी जाहीर होणार आहे.





टिप्पण्या