- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
land-sale-homeopathy-college: 200 कोटीच्या जमीन विक्रीत अडसर ठरलेले विश्वस्त विजय जानी यांच्या जीवावर उठलेले 'मास्टरमाईंड' कोण? : विजय मालोकार यांचा संतप्त सवाल
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
file image
भारतीय अलंकार न्यूज 24
नीलिमा शिंगणे जगड
अकोला : शहरातील मध्यवस्तीत असलेल्या गोरक्षण रोडवर 'होमिओपॅथी एज्युकेशन सोसायटी'ची दहा एकर जागा आहे. ही जागा सोसायटीने विक्रीला काढली आहे. मात्र जागा होमिओपॅथी कॉलेजसाठी प्रस्तावित असतांना जमीन विक्रीची निविदा काढल्याने मोठा वाद निर्माण झाला आहे. शहरात सर्वाधिक महागडी जमीन असलेल्या भागांपैकी गोरक्षण रोड हा भाग समजला जातो. ही जमीन बेकायदेशीरपणे विकण्याला संस्थेच्या विश्वस्त मंडळातील विजय जानी यांनी तीव्र विरोध दर्शविला होता. ही जमीन घशात घालण्यासाठी बेकायदेशीरपणे विक्री प्रक्रिया राबविण्याच्या संस्थेच्या प्रयत्नाविरुद्ध जानी यांनी सदैव आवाज उठवला आहे. मात्र, जमीन विक्रीला विरोध करू पाहणाऱ्या विजय जानी यांना विविध प्रकारे अडचणीत आणण्याचा प्रयत्न संचालक मंडळ आणि ही जागा घशात घालू पाहणाऱ्यांनी सुरू केला आहे. यातूनच जानी यांच्यावर एका खोट्या तक्रारीच्या माध्यमातून विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आल्याचा आरोप अकोल्यातील सामाजिक कार्यकर्ते विजय मालोकार यांनी केला आहे.
काही दिवसांपूर्वी जानी यांच्या कुटूंबियांच्या चार चाकी गाडीवर गोरक्षण रोडवर दगडफेक करण्यात आली होती. संस्था घशात घालू पाहणारे या मार्गात अडचण ठरत असलेल्या विजय जानी यांच्यावर विविध माध्यमातून दबाव आणत असल्याचा आरोप विजय मालोकार यांनी केला आहे. या सर्व लोकांपासून विजय जानी यांच्या जीवाला धोका असल्याचा दावा मालोकार यांनी व्यक्त केला आहे. विजय जानी यांच्या जीवाचं काही बरंवाईट झाल्यास याला सर्वस्वी जबाबदार हे संचालक मंडळ आणि ही संस्था घशात घालू पाहणारे मास्टरमाईंड राहणार असल्याचा इशारा मालोकार यांनी दिला आहे. विजय जानी आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या जीवाला या लोकांपासून धोका असून, सरकारने त्यांना संरक्षण द्यावं, अशी मागणी विजय मालोकार यांनी केली आहे.
निविदा काढतांना नियम बसवले धाब्यावर
या 10 एकर जागेची निविदा काढतांना त्यात मोठ्या प्रमाणात त्रृटी ठेवत गोंधळ घालण्यात आला आहे. मुळात या संपुर्ण 10 एकर जमिनीला अकृषक करतांना त्याचा तात्पुरता 'लेआऊट नकाशा' महापालिकेकडून मंजूर करण्यात आला आहे. हे करीत असतांना धर्मदाय आयुक्तांची परवानगी घेणे आवश्यक असते. मात्र, निविदा काढताना सर्वच नियम धाब्यावर बसवले गेले. निविदा प्रक्रियेत जागेचा 'लेआऊट नकाशा' मंजूर झालेला असतांना विक्री मात्र एकरानुसार करणार असल्याचे नमूद करण्यात आले आहे. येथील जागेचे दर सध्या सरकारी रेडीरेकनरनुसार 14 हजार 50 रूपये प्रति चौरस मीटर आहे. मात्र, प्रत्यक्षात येथील बाजारभाव 20 ते 25 हजार रूपये प्रतिचौरस फुट आहे. त्यातच निविदेत जागेचा प्रस्तावित दर नमूद न केल्याने ट्रस्टने जागेची किंमत किती ठेवली , हे स्पष्ट होत नाही. निविदा दाखल करताना मालमत्तेच्या नमूद किंमतीच्या 10 टक्के रक्कम अमानत रक्कम म्हणून भरावी लागते. त्यामूळे मूळ किंमत निविदेत टाकली नसल्याने आलेल्या निविदा फेटाळण्याचा 'चोर दरवाजा' ट्रस्टने उघडा ठेवला का?, असा प्रश्न मालोकार यांनी उपास्थित केला आहे.
जागा विक्रीच्या निर्णयापासून 'ट्रस्ट'चे सदस्य अनभिज्ञ
या जागा विक्रीचा निर्णय 'अकोला होमिओपॅथी एज्युकेशन सोसायटी' या ट्रस्टमधील सर्व विश्वस्थांच्या एकमताने घेतला गेल्याचा दावा ट्र्स्टच्या अध्यक्ष-सचिवांकडून केला जात आहे. मात्र, यात काही सदस्यांना हाताशी धरून हा व्यवहार होत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. 1959 मध्ये नाममात्र दरात जागा देणारे जानी कुटुंबियांचे सदस्य आणि 'ट्र्स्ट'च्या विश्वस्थांपैकी एक असलेले विजय जानी यांनी या संपुर्ण प्रकाराबाबत आपल्याला काहीही माहिती नसल्याचं म्हटलं आहे. यासंदर्भात संचालक मंडळाची कोणतीही बैठक झाली नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. ही संपुर्ण प्रक्रियाच बेकायदेशीर असल्याचा आरोप जानी यांनी केला आहे.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा