- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
heat-wave-akola-dist-vidarbha: आज पण अकोला जिल्हा विदर्भात ठरला सर्वात ‘हॉट’; 45.8 अंश तापमानाची नोंद
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
भारतीय अलंकार न्यूज 24
नीलिमा शिंगणे जगड
अकोला: विदर्भात उष्णतेची लाट तीव्र होत चालली आहे. तापमानाचा पारा वेगाने चढत असून कमाल तापमान सोबतच किमान तापमानातही वाढ होत आहे. विदर्भातील अकोला जिल्हयात 45.8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद आज शुक्रवारी करण्यात आली आहे.
भारतीय हवामान खात्याने विदर्भात उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला होता. उष्ण लाटेचा प्रत्यक्ष अनुभव सर्व विदर्भवासी घेत आहेत.
सकाळी 9 वाजता पासुनच उन्हं अधिक जाणवायला लागत. घराबाहेर पडताच उन्हाचे चटके जाणवतात. घरात देखील उन्हाच्या झावा लागतात. सायंकाळी 7 वाजे पर्यंत सुर्यनारायण तापलेला असतो. रात्री एक दीड वाजता पर्यंत उष्णता जाणवते. पहाटे थोडी फार शीतलता जाणवते. अश्या वातावरणात विदर्भ कडक उन्हाळा सहन करत आहेत.
नागपुर हवामान विभागाने दिलेल्या माहिती नुसार मंगळवारी अकोला शहरात 44 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली होती, तर बुधवारी हे तापमान 44.8 अंशावर पोहोचले. तर गुरुवारी तापमान 45.5 अंशावर पोहचले. तर आज शुक्रवारी 45. 8 अंश तापमानाची नोंद झाली आहे.
असे आहे आजचे तापमान
AKOLA - 45.8
AMRAVATI - 44.0
BHANDARA - 42.3
BULDANA - 41.5
BRAHMPURI - 45.0
CHANDRAPUR - 43.4
GADCHIROLI - 42.8
GONDIA - 41.8
NAGPUR - 42.6
WARDHA - 44.2
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा