- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
ठळक मुद्दे
*सायबर सेलला कारवाईचे निर्देश
*खोट्या संदेशांना बळी पडू नये
- जिल्हाधिकारी अजित कुंभार
भारतीय अलंकार न्यूज 24
नीलिमा शिंगणे जगड
अकोला: आता सामान्य नागरिकच नव्हे तर अकोल्याचे जिल्हाधिकारी अजित कुंभार सुद्धा सायबर क्राईमचे शिकार झाले आहेत. त्यांच्या नावाचे बनावट व्हाट्सअप अकाऊंट तयार करून पैश्याची मागणी होत असल्याचा प्रकार समोर आला. या फेक अकाऊंट द्वारे जिल्हाधिका-यांचे नाव व छायाचित्र वापरून व्हाट्स ॲपवरील बनावट अकाऊंटद्वारे परिचित व नागरिकांकडे पैश्याची मागणी होत असल्याचे निदर्शनास आले आहे.
हा प्रकार +856 2098392740, तसेच +91 93329 39128 या भ्रमणध्वनी क्रमांकांहून घडत आहे.
मात्र अशा मेसेजवर कुणीही विश्वास न ठेवता या अकाऊंटहून संदेश येताच तत्काळ पोलिसात 'रिपोर्ट' करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी श्री. कुंभार यांनी केले आहे.
आधार केंद्रचालक योगेश भाटी यांना जिल्हाधिकारी श्री. कुंभार यांच्या नावे असा मेसेज प्राप्त झाला. तो बनावट असल्याचे लक्षात येताच त्यांनी याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना अवगत केले. याबाबत जिल्हाधिका-यांनी तत्काळ दखल घेऊन सायबर सेलला कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.
अशा प्रकारचे कुठलेही संदेश प्राप्त झाल्यास कुणीही बळी पडू नये. अशा गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी तत्काळ कारवाई व नागरिकांना सतर्कतेबाबत भरीव जनजागृती करावी, असे आदेश सायबर सेलला देण्यात आले आहेत.
Ajit kumbhar
Akola collector
Akola crime
Crime news
cyber crime
Fake account
WhatsApp account
WhatsApp message
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा