crime-cars-stolen-showroom: शाळकरी मुलांना लागला ‘लक्झरी लाईफ स्टाईल’ चा शौक ; शो रूम मधून चोरल्या नव्या कोऱ्या कार, पाच मुलांना पोलीसांनी घेतले ताब्यात





भारतीय अलंकार न्यूज 24

ॲड. नीलिमा शिंगणे जगड 

अकोला: शाळकरी मुलांना ‘लक्झरी लाईफ स्टाईल’ ने जगण्याचा शौक लागला आहे. मात्र त्यासाठी भरपूर पैसा लागतो. पण हा पैसा आणायचा कुठून, असा प्रश्न त्यांच्या समोर उभा राहतो. मग अल्पवयातच ही मुले गुन्हेगारी कडे वळतात. याचेच एक उदाहरण म्हणजे अकोला सारख्या शहरात उघडकीस आलेला प्रकार. या शाळकरी मुलांना पोलीसांनी चोरीच्या मालासह ताब्यात घेतले आहे. ताब्यात घेतलेली ही अल्पवयीन मुले सधन कुटुंबातील आणि प्रतिष्ठित नामवंत शाळेतील आहे, हे येथे उल्लेखनीय आहे. या मुलांनी आपले शौक पुर्ण करण्यासाठी आणि सोशल मीडियावर रिल्स बनविण्यासाठी शो रूम मधल्या नव्या कोऱ्या कार चोरल्याचा गुन्हा केला असल्याचे उघडकीस आले आहे. यातील एक मुलगा 18 वर्षाचा असून अन्य चार अल्पवयीन आहेत. या मुलांकडून पोलीसांनी आतापर्यंत तीन महागड्या कार जप्त केल्या आहेत.


आज बुधवारी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय येथे जिल्हा पोलीस अधीक्षक बच्चन सिंह यांनी पत्रकार परिषद घेवून या गुन्ह्याची माहिती प्रसार माध्यमाला दिली.


एमआयडीसी पोलीस ठाणे अंतर्गत येणाऱ्या शिवनी परिसरात एक ऑटोमोबाईल्स आहे. त्या ठिकाणी  महिंद्रा गाड्यांची विक्री व दुरुस्ती होते. या शोरूम मधून अल्पवयीन मुलांनी  महागड्या गाड्या चोरून शहरातील मुख्य मार्गावर चालवत होते. आरटीओ विभागात नोंदणीकृत नसताना ही नवी कोरी कार रस्त्यावर कशी चालत आहे ही बाब लक्षात आल्यानंतर कंपनीच्या व्यवस्थापकांनी तातडीने चौकशी केली असता चार पाच महागड्या नव्या गाड्या शोरूम मधून बेपत्ता झाल्याचे लक्षात आले. सोमवारी रात्री ही बाब एमआयडीसी पोलिसांपर्यंत पोहोचल्यानंतर पोलिसांनीही चोरट्यांचा माग घेत रात्रभरात दोन महागड्या गाड्या ताब्यात घेतल्या. या संदर्भात  अल्पवयीन शाळकरी मुलांना पोलिसांनी ताब्यात घेतले. पाच पैकी एक मुलगा अठरा वर्ष पूर्ण झालेला असल्याने त्याला न्यायालयाने एक दिवस पोलीस कोठडी दिली असून, इतर चार अल्पवयीन आरोपींना बाल सुधारगृहात पाठविण्यात आले. 




पोलीस स्टेशन एमआयडीसी हद्दीत असलेल्या महिंद्रा शोरूम येथील स्टॉक यॉर्ड मधुन आरोपींनी चोरून नेलेल्या एकुण फोर व्हिलर तीन गाडी ज्यामध्ये दोन महिंद्रा गाडी XUV 700, एक महिंद्रा स्कॉर्पिओ एन झेड टु तसेच दोन मोटर सायकल एकुण किंमत सत्तर लाख रूपयेच्या गाडीचा शोध घेवुन पोलीसांनी पाच आरोपींना आतापर्यंत अटक केली आहे.




अशी उघडकीस आली घटना 

6 मे रोजी फिर्यादी यांनी तक्रार दिली की, ते महिंद्रा ऍण्ड महिंद्रा कंपनीमध्ये काम करीत असुन, त्यांचा मित्र दीपक वक्टे व ते जेवण करून दोघे मोटरसायकलने फिरत असताना, रात्री दहा वाजताच्या दरम्यान त्यांचे महिंद्रा फोर व्हिलर स्टॉक यॉर्ड मधील नंबर नसलेली नवीन फोर व्हीलर गाडी XUV 700 गाडी (स्पेशल ईडीशन ब्लेज मॅटफिनिश रेड रंगाची गाडी किंमत सव्वीस लाख ) ही अकोला शिवणी विमानतळाकडे जात असतांना दिसली. गाडीमध्ये दोन अज्ञात इसम गाडी चालवितांना दिसुन आले. त्यांना आवाज देवुन गाडी थांबविण्याचा प्रयत्न केला असता, ते गाडी घेवुन पळुन गेले. या वरून फिर्यादी यांनी स्टॉक यॉर्ड मध्ये जावुन पाहीले असता, फोर व्हीलर गाडी XUV 700 गाडी स्पेशल ईडीशन ब्लेज मॅटफिनिश रेड रंगाची गाडी दिसुन आली नाही. यावरून सदरची गाडी कोणीतरी अज्ञात इसमांनी चोरून नेली आहे. 


पाच आरोपी ताब्यात 

या रिपोर्ट वरून पोलीसांनी गुन्हा तपासात घेतला. गुन्हयाचे तपासात पोलीस स्टेशन एमआयडीसी अकोला यांनी वरिष्ठांचे मार्गदर्शनाखाली तपास करून मिळालेल्या माहीतीचे आधारे गुन्हयातील आरोपी मिर्झा अबेद मिर्झा सईद बेग (रा. कलाल चाळ अकोला) यास व चार विधी संर्घष ग्रस्त बालक यांना तपास कामी ताब्यात घेतले. तपासा दरम्यान गुन्हयातील चोरीला गेलेले वाहने एकुण तीन फोर व्हिलर गाडी ज्यामध्ये दोन महिंद्रा गाडी XUV 700, प्रत्येकी किंमत 26 लाख एकुण 52 लाख तसेच एक महिंद्रा स्कॉपिओ एन झेड टु पांढ-या रंगाची फोर व्हिलर गाडी किंमत 17 लाख रूपये तसेच गुन्हयात वापरलेल्या दोन मोटर सायकल प्रत्येकी किंमत 50 हजार रूपये एकुण 1 लाख रू. एकुण सर्व मुद्देमालाची किंमत सत्तर लाख रूपये  किंमतीचा मुद्देमाल तपासात जप्त केला. या गुन्हयात आणखीन वाहने मिळुन येण्याची शक्यता बच्चन सिंह यांनी यावेळी वर्तविली.


यांनी केली कार्यवाही 

सदरची कार्यवाही पोलीस अधिक्षक  बच्चन सिंह, अपर पोलीस अधिक्षक अभय डोंगरे , उपविभागीय पोलीस अधिकक्ष  सतिष कुळकर्णी  यांचे मार्गदर्शना खाली पोलीस निरीक्षक वैक्षाली मुळे एमआयडीसी अकोला पो. उपनि. सुरेश वाघ, ए एस आय विजय जामनिक, ए एस आय राठोड, विजय अंभोरे , अजय नागरे, मोहन ढवळे , सुनिल टाकसाळे , उमेश इंगळे, पो कॉ मोहन भेडारकर, भुषण सोळंके, अनुप हातोळकर, सचिन घनबहादुर, निलेश वाकोडे, सर्व पोलीस स्टेशन एम आय डी सी अकोला यांनी कामगीरी पार पाडली आहे.


कुणाचा आहे वरदहस्त ?

शोरूम मधून आलिशान नव्या कोऱ्या गाड्या चोरी कशा होतात, हा प्रश्न प्रत्येकाला पडणे साहजिक आहे. मात्र अकोल्यात तसे घडले आहे. त्यापैकी एक गाडी जुने शहरातील गीता नगर मधून पोलिसांनी जप्त केली आहे. आतापर्यंत तीन गाड्या जप्त केल्या असल्या तरी उर्वरित गाड्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरू आहेत. नव्या कोऱ्या चार चाकी गाड्या चोरी करण्यामागे केवळ हे अल्पवयीन मुलेच आहेत की यांचा कुणी बडा मोहरक्या आहे का कुणाचा यांना वरदहस्त आहे, याबाबात पोलिसांकडून सखोल चौकशी होणे गरजेचे आहे.



याआधी नव्या कोऱ्या दुचाकी चोरी 

अकोला शहरातून नवीन कोऱ्या गाड्या चोरीला जाणे ही नवीन बाब नाही. यापूर्वी सुद्धा खदान पोलिस ठाण्याच्या हद्दीतून नवीन दुचाकी चोरीला गेल्या होत्या. एक दोन नव्हे तर तब्बल 100 दुचाकी चोरी गेल्यानंतर शोरूम मालकाला मोठ आर्थिक फटका बसला होता. त्यानंतर पोलिसांनी आपली चक्रे फिरवून बहुतांश गाड्या जप्त केल्या होत्या.



टिप्पण्या