court-news-life-imprisonment: मतीमंद व दिव्यांग पीडितेवर अत्याचार करणाऱ्या आरोपीस दुहेरी जन्मठेप




भारतीय अलंकार न्यूज 24

ॲड. नीलिमा शिंगणे जगड 

अकोट, दि. 08: मतीमंद व दिव्यांग पीडितेवर अत्याचार करणाऱ्या आरोपीस अकोट न्यायलयाने आज दुहेरी जन्मठेपेच्या कारावास व 1,05,000 रुपये दंडाची शिक्षा ठोठावली


जिल्हा व सत्र तसेच विशेष न्यायाधीश चकोर बाविस्कर यांनी सत्र खटला क्र. 08/2021 मधील आरोपी राजेश मनोहर पाठक (वय 40 वर्ष रा. ढोमणपुरा, सोमवारवेस अकोट ता. अकोट जि. अकोला) या आरोपी विरूध्द मतीमंद व दिव्यांग मुलीवर अत्याचार प्रकरणी गुन्हा सिध्द झाल्याने आरोपीला भारतीय दंड विधानच्या विविध कलमांतर्गत  शिक्षा सुनावली आहे.


376 (2) (एल) या कलमांतर्गत गुन्हयाकरिता आरोपीस त्याच्या नैसर्गिक जीवनाच्या अंतापावेतो सश्रम जन्मठेपेच्या कारावासाची शिक्षा आणि पन्नास हजार रुपये  रकमेच्या द्रव्यदंडाची शिक्षा ठोठावली आहे. व दंड न भरल्यास सहा वर्षाच्या अधिकच्या कारावासाची शिक्षा भोगावयाची आहे. कारावासाच्या सर्व शिक्षा आरोपीने एकत्रितरित्या भोगावयाच्या आहेत.


भादंविच्या कलम 376 (2) (एन) या कलमांतर्गत शिक्षापात्र गुन्हयाकरिता आरोपीस नैसर्गिक जीवनाच्या अंतापावेतो सश्रम जन्मठेपेच्या कारावासाची शिक्षा आणि पन्नास हजार रूपये फक्त रकमेच्या द्रव्यदंडाची शिक्षा ठोठाविण्यात येत आहे. व द्रव्यदंड न भरलया आरोपीने सहा वर्षाचा अधिकचा कारावास भोगावयाचा आहे.


भादंविच्या 506 या कलमांतर्गत शिक्षा पात्र गुन्हयाकरिता आरोपीस पाच  वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा आणि रूपये 5000 रुपयेच्या द्रव्यदंडाची शिक्षा व द्रव्यदंड न भरल्यास आरोपीने एक वर्ष अधिकच्या कारावासाची शिक्षा भोगावयाची आहे.


आरोपीच्या प्राधान्याच्या कारावासाच्या शिक्षा त्याने संयुक्तपणे म्हणजे एकत्रितरित्या भोगावयाच्या आहेत. मात्र द्रव्यदंड न भरल्यास भोगावयाच्या वैकल्पिक कारावासाच्या शिक्षा आरोपीने स्वतंत्रपणे म्हणजे एकानंतर दुसरी अशा रितीने भोगावयाच्या आहेत.


तसेच आरोपीने काही एक द्रव्यदंड अपील कालावधीनंतर त्या द्रव्यदंडाची संपूर्ण रक्कम पीडितेच्या हितासाठी वापरण्यासाठी तिच्या आई-वडीलास संयुक्त बँक खात्या द्वारा देण्यात यावी.


या प्रकरणाची थोडक्यात हकिकत अशी आहे की, नमूद प्रकरणात पीडितेची आई ही फिर्यादी असून, यांनी पो.स्टे. ला येवून जबानी रिपोर्ट दिला की, ती तिचे पती, दोन मुलं व मुलगी असे एकत्र राहत असून, घरकाम करून कुटूंबाचा उर्दनिर्वाह चालवितात. पीडिता मुलगी जन्मताच मतीमंद व दिव्यांग असल्याने तिला थोडेफार चालता येते. पीडिता मुलगी हिला मार्च महिन्यात तब्येत खराब झाली.त्यामुळे फिर्यादीने तिला  17 मार्च 2020 रोजी डॉक्टरांकडे दवाखान्यात नेले होते. व त्यावेळी तिची दवाखान्यामध्ये चाचणी करण्यात आली. त्यावेळी पीडिता ही गर्भवती असल्याचे चाचणीमध्ये निष्पन्न झाले. त्यानंतर पीडितेला विश्वासात घेवून, तिला विचारपूर केली त्यावेळी तिने आरोपीने तिचे सोबत फिर्यादी व त्यांचे नातेवाईक घरी नसतांना वारंवार जबरदस्तीने अत्याचार केल्याचे सांगितले. त्यामुळे तिला गर्भधारणा झाल्याचे तिने सांगितले, अशा तक्रारी वरून पोलीसांनी गुन्हा दाखल करून तपासात घेतला होता.


या प्रकरणात सरकार पक्षातर्फे सरकारी वकील पी.बी. सहारे यांनी आरोपी विरूध्दचा गुन्हा सिध्द करण्याकरिता  एकूण 22 साक्षीदारांच्या साक्षी  न्यायालयात या खटल्यामध्ये नोंदविल्या आहे. आरोपी विरूध्द गुन्हा सिध्द झाल्याने आरोपीला न्यायलयाने शिक्षा सुनावली. 



शिक्षेसंबंधी सुनावणी दरम्यान  न्यायालयात सरकारी वकील पी.बी. सहारे यांनी युक्तीवाद केला की, आरोपीने केलेला गुन्हा हा गंभीर स्वरूपाचा असून, आरोपीला शिक्षेमध्ये दया, बुध्दी दाखविल्यास समाजात चुकीचा संदेश जाईल. त्यामुळे आरोपीस जास्तीत जास्त शिक्षा द्यावी. दोन्ही पक्षाचा युक्तीवाद ऐकून न्यायालयाने आरोपीला शिक्षा ठोठावली. 


या प्रकरणात तपासी अंमलदार म्हणून धिरज चव्हाण एपीआय अकोट शहर पोलीस स्टेशन अकोट यांनी तपास करून दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले. तसेच पैरवी अधिकारी म्हणून प्रकाश जोशी  यांनी मोलाचे सहकार्य केले व साक्षीदारांना न्यायालय समक्ष हजर करण्यास मदत केली


टिप्पण्या