city-crime-news-akola-police : पिस्तुलाच्या धाकावर ठाणेदाराने युवती सोबत केले गैरवर्तन; अकोला पोलीस विभागाची प्रतिमा मलीन




भारतीय अलंकार न्यूज 24

नीलिमा शिंगणे जगड 

अकोला: पिस्तुलाच्या धाकावर ठाणेदाराने आपल्या सोबत गैरवर्तन केल्याची तक्रार युवतीने दिल्याने या प्रकरणी नागपूर मधील नंदनवन पोलीस ठाणे येथे अकोला शहरातील खदान पोलीस ठाण्याचे ठाणेदार धनंजय सायरे विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकारामुळे अकोला पोलीस विभागाची प्रतिमा मलीन झाली आहे.



प्राप्त माहितीनुसार, पीडित 22 वर्षीय युवतीचे वडील सुद्धा पोलीस खात्यात हवालदार पदावर कार्यरत आहेत. तिच्या वडिलाची धनंजय सायरेशी मैत्री होती. त्यामुळे धनंजयचे पीडितेच्या नेहमी घरी येणे-जाणे होते. पिडीतेला देखील पोलीस अधिकारी व्हायचे आहे. यामुळेच पीडिता आणि धनंजयची मैत्री वाढली. आर्थिक व अन्य मदतीचे प्रलोभन दाखवून धनंजय सायरेने पिडीतेस आपल्या जाळ्यात ओढले. त्याने तिला आयफोन सुध्दा भेट दिला तसेच तिला आर्थिक मदत केली. दरम्यान पीडिता ही नागपूर येथील नंदनवन भागात वास्तव्यास आहे. येथे राहून यूपीएससी स्पर्धा परीक्षेची तयारी करीत आहे. मागील काही दिवसांपासून धनंजय पीडितेला व्हॉट्सअपवर संदेश पाठवून, तिचे वस्त्र रहित छायाचित्र पाठविण्याची मागणी पिडीतेस करू लागला. त्यामुळे पिडितेस धक्का बसला. तिने फोटो पाठविण्यास नकार दिला. त्यामुळे डोक्यात राग घेवून धनंजय सायरे शनिवारी सायंकाळी नागपुरात पोहचला व थेट पीडितेच्या फ्लॅटवर गेला. तिला शरीर संबंधाची मागणी करीत तिच्यावर बळजबरी करायला लागला. मात्र पीडितेने विरोध करताच त्याने तिच्यावर पिस्तूल रोखली आणि तिचे शीलहरण करण्याचा प्रयत्न केला. त्याने भेट दिलेला आयफोनही तिच्या कडून हिसकावून घेतला. नंतर तिला मारहाण केली. यानंतर पीडितेने थेट नंदनवन पोलीस ठाणे गाठले. 


पीडितेने वरिष्ठ पोलीस निरीक्षक धनंजय सायरे याच्याविरुद्ध विनयभंगाची तक्रार दिली. सूत्रांच्या माहितीनुसार या तक्रारीची तात्काळ दखल घेवून नंदनवन पोलिसांनी धनंजय सायरे विरूद्ध गुन्हे दाखल केले आहेत. 



आपल्या स्टायलिश राहणीमानावरून दबंग अधिकारी म्हणुन ओळख असलेले धनंजय सायरे या प्रकरणात निर्दोष आहेत की दोषी हे येत्या काळात कळेलच. मात्र पोलीस विभागाने पारदर्शी तपास करणे अपेक्षित आहे. कारण पीडिता आणि आरोपी दोन्ही पोलीस खात्याशी संबंधित आहेत. 

टिप्पण्या