- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
भारतीय अलंकार न्यूज 24
नीलिमा शिंगणे जगड
अकोला: वनपरिक्षेत्र कार्यालय हिवरखेड येथील लाचखोर लिपिक 1500 रुपयाची लाच घेताना रंगेहाथ एसीबीच्या जाळ्यात अडकला आहे. ही यशस्वी कारवाई अँटी करप्शन ब्यूरो अकोला यांनी सोमवारी केली.
59 वर्षीय कारला, तेल्हारा येथील तक्रारदार यांनी तालुका - तेल्हारा , जिल्हा - अकोला यांनी देविदास शिवाजी चवरे , (वय- 34 वर्ष, व्यवसाय नोकरी लिपिक नेमणूक फिरते पथक वनपरिक्षेत्र कार्यालय हिवरखेड ता. तेल्हारा अकोला जि. अकोला, राहणार साखरखेर्डा तालुका सिंदखेड राजा जिल्हा बुलढाणा ह मू. सिताराम भड यांच्या घरी किरायाने हिवरखेड तालुका - तेल्हारा जिल्हा - अकोला) यांच्यावर रक्कम 1500 रुपये लाच मागणी केली. आरोपीने 1500 रूपये लाच स्वीकारल्याचे निष्पन्न झाले.
यातील तक्रारदार यांनी 3 में 2024 रोजी अँटी करप्शन ब्युरो अकोला येथे तक्रार दिली की, वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालय वान जिल्हा अमरावती कॅम्प हिवरखेड जिल्हा अकोला येथील लिपिक चवरे हे तक्रारदार यांचे सन 2023 -24 या वित्तीय वर्षाचे इन्कम टॅक्स संबंधाने केलेल्या कामाचा मोबदला म्हणून 1000 रुपये आणि एरियस काढून दिल्याचे मोबदल्यात 500 रुपये असे एकूण पंधराशे रुपये लाच रकमेची मागणी करीत आहेत.
तक्रारीच्या अनुषंगाने 3 मे 2024 रोजी पडताळणी कारवाई आजमावण्यात आली. यात आरोपी लिपिक याने लाच रक्कम 1500 रुपये मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर सोमवार 20 मे रोजी सापळा रचून कारवाई आजमावली. यावेळी आरोपी लोकसेवक देविदास चवरे याने तक्रारदाराकडून लाच रक्कम 1500 रुपये स्वीकारल्याने आरोपी चवरे याला एसीबीने ताब्यात घेतले. भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम अन्वये हिवरखेड पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे.
पोलीस अधिक्षक मारुती जगताप, अनिल पवार अप्पर पोलीस अधीक्षक, (ला.प्र.वी.अमरावती परिक्षेत्र,अमरावती यांचे मार्गदर्शनात ही कारवाई तपास अधिकारी सचिन सावंत पोलीस निरीक्षक लाप्रवि अकोला, नरेंद्र खैरनार पोलिस अंमलदार प्रदिप गावंडे, दिगंबर जाधव आदींनी केली.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा