arun-vora-kidnapping-case-akl: खंडणीसाठी व्यापाऱ्याचे अपहरण; आणखी दोन आरोपींना अटक




भारतीय अलंकार न्यूज 24

नीलिमा शिंगणे जगड 

अकोला: एक कोटी रूपये खंडणी मागण्याच्या उद्देशाने अकोल्यातील व्यापारी अरूण वोरा यांचे अपहरण  प्रकरणात आतापर्यंत 6 आरोपींना अटक करण्यात आली होती. तर आज आणखी दोन आरोपींना जेरबंद करण्यात पोलीसांना यश आले आहे.


शहरातील रामदास पेठ पोलीस ठाणे अंतर्गत असलेल्या रायली जीन परिसरात व्यवसाय करणारे अरुण वोरा या व्यवसायिकाचे अज्ञात आरोपींनी अपहरण केले होते. आरोपी एक दोन तास वोरा यांच्या करिता दबा देऊन होते. मात्र संधी मिळताच त्यांनी वोरा यांचे अपहरण केले.विशेष म्हणजे या अपहरणकर्त्यांमध्ये एक आरोपी अरुण वोरा यांच्या कारखान्यात अनेक वर्षांपासून काम करणारा आहे. आरोपींनी वोरा यांना डोळ्यावर पट्टी आणि हाथ पाय बांधून गाडीत बसवून शहरालगतच्या भागात फिरवून मध्यरात्री शहरातीलच चिव चिव बाजारात रात्रभर ठेवले. यानंतर पहाटे आरोपींनी वोरा यांना शहरापासून 15 किलोमिटर असलेल्या कान्हेरी सरप या गावात एका ठिकाणी कोंबून ठेवलं.  मात्र या काळात आरोपींना वोरा यांच्या कुटुंबीयांशी संपर्क साधता आला नाही. त्यामुळे ते खंडणीची मागणी सुद्धा करू शकले नाही. शेवटी पोलीस आपल्या पर्यंत लवकरच पोहचणार असल्याची खुमखुमी लागताच आरोपींनी वोरा यांना एका ऑटोत बसवून घरी पाठवले होते.



स्थानिक गुन्हे शाखेनी सीसीटिव्ही आणि ऑटो चालकाच्या माध्यमातून 5 आरोपींना अटक केली होती, यामध्ये एक आरोपी दिव्यांग आहे.पोलिसांनी या घटनेत वापरण्यात आलेली  दोन पिस्टल आणि एक चार चाकी वाहन सुद्धा जप्त केल आहे. या आरोपीं विरुद्ध दरोडा , आर्म ॲक्ट सह विविध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलीसांनी मिथुन उर्फ मोटी सुधाकर इंगळे (रा.जुना आळशी प्लाटचे बाजूला बाजुला चिवचिव बाजार अकोला), किशोर पुंजाजी दाभाडे( रा. ग्राम कळंबेश्वर ता+जि. अकोला) , फिरोज खान युसूफ खान रा. जुना आळशी प्लाटचे बाजुला अकोला , शरद पुंजाजी दाभाडे (रा. ग्राम कळंबेश्वर ता+जि. अकोला) ,अशिष अरविंद घनबाहादुर (रा. बोरगाव मंजु) यांना यापूर्वीच ताब्यात घेतले आहे. तर राजा सरफराज खान (रा. कान्हेरी सरप) , चंदु इंगळे (रा. खदान अकोला) आणि चंदुचा एक मित्र यांचाही या गुन्ह्यात सहभाग असल्याचे निष्पन्न झाले होते. अटक करण्यात आलेल्या पाच आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली होती. त्यानतंर आणखी एकाला पोलीसांनी अटक केली होती तर आज चंदन उर्फ चंदू अरुण इंगळे आणि  मनीष उर्फ मन्या गजानन गोपनारायण या दोघांना पोलीसांनी अटक केली. यामुळे या प्रकरणात आणखी काही नवे खुलासे समोर येणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


पोलीस अधीक्षक बच्चन सिंह ,अपर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे ,शहर एसडीपीओ सतीश कुलकर्णी ,क्राइम ब्रांचचे पोलीस निरीक्षक शंकर शेळके, रामदास पेठचे पोलीस निरिक्षक मनोज बहुरे यांच्या मार्गदर्शनात पोलिस स्टेशनचे कर्मचारी किशोर गवळी, संतोष गवई, आकाश जमोदे आदींनी ही कारवाई केली.







टिप्पण्या