- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
akola-sports-wrestling-coach: अकोला क्रीडा क्षेत्राला कुस्ती प्रशिक्षकाने फासली काळीमा; प्रशिक्षणार्थी मुलीवर ठेवली वाईट नजर, पोलीसांनी ठोकल्या बेड्या
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
भारतीय अलंकार न्यूज 24
नीलिमा शिंगणे जगड
अकोला : शहरातील जुने शहर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या एका कुस्ती प्रशिक्षकानी आपल्याकडे कुस्तीचे धडे गिरविण्यास येणाऱ्या एका अल्पवयीन मुलीवर वाईट नजर ठेवत तिचा विनयभंग केल्याची घटना उघडकीस आली. याप्रकरणी जुने शहर पोलिसांनी गुन्हे दाखल करून कुस्ती प्रशिक्षक जयशंकर धूर्वे याला अटक केली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, या प्रकरणातील पीडित मुलगी ही 9 मे रोजी रागाच्या भरात घरून निघून गेली होती. बराच वेळ होऊनही ती घरी परत न आल्याने कुटुंबीयांनी तिचा शोध घेतला. मात्र तरी ती मिळून आली नाही. अखेर त्याच दिवशी रात्री कुटुंबीयांनी जुने शहर पोलीस स्टेशन गाठत मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली.
या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी शोध मोहीम सुरू करीत मुलीच्या मैत्रिणी व नातेवाईकांची विचारपूस केली. कुस्ती कोच जयशंकर धुर्वे यांना पीडित मुलीबद्दल माहीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार कुस्ती प्रशिक्षक जयशंकर धूर्वे यांना विचारपूस केली असता, त्यांनी सुरवातीला उडवा उडवीची उत्तरे दिली. मात्र सखोल चौकशी केली असता धक्कादायक माहिती पोलिसांसमोर उघडकीस आली. विशेष म्हणजे मुलगी बेपत्ता झाल्यापासून शहरालगत असलेल्या बालगृहात राहायला गेली होती. तिचा शोध लागल्यानंतर महिला व बालकल्याण समिती आणि पोलिसांनी तीच म्हणणे ऐकून घेतले. तिने कुस्ती शिकायला जात असलेल्या कोचिंग सेंटर मधील कोचने तिचा विनयभंग केल्याचे सांगितले. राष्ट्रीय महामार्गालगत जात असलेल्या रस्त्याने तिला कोच याने बळजबरीने सोबत नेण्याचाही प्रयत्न केला असल्याचा आरोप मुलीने केला आहे.
याप्रकरणी पोलिसांनी लगेच कुस्ती कोच जयशंकर धूर्वे याला ताब्यात घेत अपहरणाच्या संशयावरून विनयभंग केल्याप्रकरणी भांदवि कलम 363, 354 आणि पोक्सो अंतर्गत गुन्हे दाखल केले. याप्रकरणी आणखी सखोल तपास जुने शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नितीन लेव्हणकर करीत आहे.
गुरू शिष्याच्या नात्याला काळीमा फासणारी ही घटना अकोला क्रीडा क्षेत्रासाठी नवी नाही. याआधी सुध्दा बॅडमिंटन कोच ,कबड्डी कोच यांनी अकोला क्रीडा क्षेत्र मलीन केले आहे. यातील दोघाना कोर्टाने कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. तरी देखील अकोला क्रीडा क्षेत्रात असे गैरवर्तन होण्याचे थांबले नाहीत, हे आज उघडकीस आलेल्या घटनेवरून दिसून येत आहे.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा