- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
भारतीय अलंकार न्यूज 24
नीलिमा शिंगणे जगड
अकोला: विदर्भात उष्णतेची लाट तीव्र होत चालली आहे. तापमानाचा पारा वेगाने चढत असून कमाल तापमान सोबतच किमान तापमानातही वाढ होत आहे. विदर्भातील अकोला शहरात 45.5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद आज गुरूवारी करण्यात आली.
भारतीय हवामान खात्याने विदर्भात उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला असून, त्याचे परिणाम दिसून येत आहेत. तापमानासोबतच उकाडा देखील वाढला असून घराबाहेर पडताच उन्हाचे चटके जाणवत आहेत. मंगळवारी अकोला शहरात 44 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली होती, तर बुधवारी हे तापमान 44.8 अंशावर पोहोचले. तर आज गुरुवारी तापमान 45.5 अंशावर गेल्याने कदाचित महाराष्ट्रात सर्वाधिक तापमान असल्याच अंदाज वर्तविला जातं आहे.
असे आहे विदर्भातील तापमान
AKOLA - 45.5
AMRAVATI - 43.2
BHANDARA - 40.2
BULDANA - 42.0
BRAHMPURI -43.2
CHANDRAPUR- 43.2
GADCHIROLI - 42.6
GONDIA - 40.4
NAGPUR - 41.9
WARDHA - 43.2
WASHIM - 42.0
YAVATMAL- 43.5
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा