akola-city-crime-khadan-area: जेतवन नगरात दोन गटात सशस्त्र राडा; एक गंभीर जखमी





भारतीय अलंकार न्यूज 24

अकोला: खदान पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या जेतवन नगरात जुन्या भांडणातून दोन गटात हाणामारी झाली असून, धारदार शस्त्राने वार केल्याने युवक गंभीर जखमी झाला आहे. जुन्या वादातून दोन गटात सशस्त्र राडा झाला. वादाचे पर्यवसान तुफान हाणामारीत झाले. यामधे दोन्ही गटातील लोक जखमी झाले असून, त्यांना तातडीने जिल्हा सर्वोपचार रुग्णालयात उपचार्थ दाखल करण्यात आले आहे. ही घटना रविवारी रात्री घडली.



उसनवारीच्या पैशावरून हा वाद उफाळून आल्याची माहिती आहे. या घटनेत दोन्ही गटातील 9 ते 10 जण जखमी झाले असून, गोलू नामक युवकाची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते. त्याच्यावर सर्वोपचार रुग्णालयात उपचार सुरू आहेत.


12 मे रोजीच्या रात्री दोन गटात वाद झाले. परस्परांविरूद्ध दिलेल्या तक्रारीवरून खदान पोलीस स्टेशन येथे जिवघेणा हल्ला प्रकरणी भादंवि विविध कलमान्वये आणि ऍट्रॉसिटी ॲक्ट नुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 


आतापर्यंत दोन्ही गटातले प्रत्येकी तीन- तीन लोकांना ताब्यात घेतले असून, पुढील तपास पोलीस निरीक्षक धनंजय सायरे आणि त्यांचे पथक करीत आहेत. सध्या जेतवन नगर परिसरातील परिस्थीती नियंत्रणात आहे. 


टिप्पण्या