unseasonal-rains-in-akola: अवकाळी पावसाने घातले थैमान: शेतीचे प्रचंड नुकसान; शेतकऱ्यांच्या मदतीसाठी आचारसंहितेत शिथिलता आणावी- आमदार सावरकर यांची मागणी





भारतीय अलंकार न्यूज 24

नीलिमा शिंगणे जगड 

अकोला: अकोला शहरासह जिल्हयात मंगळवारी सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने नागरिकांची तारांबळ उडाली. त्यातच गुढीपाडवा असल्यामुळे उभारलेल्या गुढी सायंकाळी उतरविताना  महिला वर्गाची तारेवरची कसरत झाली. तर गारपीट वादळी वाऱ्यामुळे ग्रामीण भागात शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. सायंकाळी वादळी वारा, मेघ गर्जना, विजांचा कडकडाटासह पावसाने हजेरी लावल्याने शेत पिकाचे प्रचंड नुकसान झाले.





अचानक गारपीट, हवा, पाणीमुळे ग्रामीण भागातील नागरिकांना वीज पुरवठा तसेच शेतीचे नुकसान मोठ्या प्रमाणावर झाले असून, यासंदर्भात निवडणूक आयोगाने शिथिलता देऊन सरकार व प्रशासनाला पाहणी आणि मदत कार्यासाठी व आदेश द्यावे मानवतेचे कार्य करावे, अशी मागणी जिल्हा प्रदेश भाजपा सरचिटणीस आमदार रणधीर सावरकर यांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे.



 

अचानक हवामान मुळे महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये तसेच अकोला  जिल्ह्यामध्ये गारपीट पावसामुळे मोठ्या प्रमाणात वीज वितरण कंपनीची व्यवस्था मध्ये बिघाड झाला असून त्यासंदर्भात वीज वितरण अधिकाऱ्यांनी ताबडतोब सक्षम यंत्रणा उभी करावी व नागरिकांना त्रास होणार नाही या दृष्टीने पावले उचलण्यासाठी कारवाई करावी. तसेच भाजीपाला, गहू, आंबे, संत्रा, कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणावर नुकसान झाला असून, यासंदर्भात नुकसान भरपाई देण्यासाठी अकोला 

अचानक गारपीट हवा पाणी मुळे ग्रामीण भागातील नागरिकांना वीस पुरवठा तसेच शेतीचे नुकसान मोठ्या प्रमाणावर झाले असून यासंदर्भात निवडणूक आयोगाने शिथिलता देऊन सरकार व प्रशासनाला पाहणी आणि मदत कार्यासाठी व आदेश द्यावे मानवतेचे कार्य करावे अशी मागणी जिल्हा प्रदेश भाजपा सरचिटणीस आमदार रणधीर सावरकर यांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे.



 

अचानक हवामान मुळे महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये तसेच अकोला जिल्हा जिल्ह्यामध्ये गारपीट पावसा पाऊस मुळे मोठ्या प्रमाणात वीज वितरण कंपनीची व्यवस्था मध्ये बिघाड झाला असून त्यासंदर्भात वीज वितरण अधिकाऱ्यांनी ताबडतोब सक्षम यंत्रणा उभी करावी व नागरिकांना त्रास होणार नाही या दृष्टीने पावले उचलण्यासाठी कारवाई करावी तसेच निवडणूक आयोगाने भाजीपाला गहू आंबे संत्रा कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणावर नुकसान झाला असून यासंदर्भात नुकसान भरपाई देण्यासाठी राज्य शासनाला आदेश व परवानगी द्यावी व महत्त्वाचे काम करण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याचे साठी परवानगी द्यावी, अशी मागणी भाजपा प्रदेश सरचिटणीस आमदार रणधीर सावरकर यांनी केली.  



राज्याचे मुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस अजित पवार जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील व जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी या संदर्भात आग्रही  भूमिका असून आपले सहकारी आमदार अमोल मिटकरी, आमदार वसंत खंडेलवाल, आमदार किरण सरनाईक, आमदार हरीश पिंपळे, आमदार प्रकाश भारसाकले यांनी या संदर्भात राज्य शासनाकडे पाठपुरावा केला आहे.



 

हवामान खात्याच्या अंदाजे प्रमाणे राज्यातील चार दिवस मोठ्या प्रमाणात गारपीट पाऊस येण्याची शक्यता लक्षात घेता, शासनाने मदत कार्याला गती देण्याचा निर्णय घेतला असला तरी त्याला निवडणूक आयोगाची परवानगी लागत असून जिल्हा प्रशासनाने या संदर्भात सक्षम यंत्रणा उभी करून नागरिकांना व ग्रामस्थांना त्रास होणार नाही या दृष्टीने उपाययोजना व सूचना देण्यात याव्या, अशी ही मागणी आमदार रणधीर सावरकर यांनी केली आहे.



टिप्पण्या