summer-vacation-for-schools: राज्य मंडळाच्या सर्व शाळांना 2 मे पासून उन्हाळ्याच्या सुट्ट्या; विदर्भातील शाळा 1 जुलै पासून सुरू होणार




भारतीय अलंकार न्यूज 24

अकोला: शासनाने संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील राज्याच्या प्राथमिक, माध्यमिक व शाळांच्या उन्हाळी सुट्ट्या 18 एप्रिल रोजी एक परिपत्रक काढून जाहीर केल्या आहेत. यानुसार राज्यातील राज्य मंडळाच्या सर्व शाळांना गुरूवार  02 मे पासून उन्हाळी सुट्ट्या लागणार आहेत.



राज्यातील माध्यमिक उच्च माध्यमिक शाळांना २ मे पासून उन्हाळी सुट्ट्या जाहीर करण्यात आल्या आहेत. शिक्षण संचालनालयाने यासंदर्भात परिपत्रक काढले आहे.




राज्यातील इतर मंडळांच्या शाळांनी त्यांच्या स्तरावर उचित निर्णय घ्यावा,असे पत्रकात म्हटले आहे.





विदर्भ वगळता राज्यातील इतर ठिकाणी पुढील शैक्षणिक वर्ष 15 जूनपासून सुरू होणार आहे. शिक्षण संचालनालयाने जाहीर केलेल्या परिपत्रकानुसार संपूर्ण राज्यातील प्राथमिक, माध्यमिक व शाळांची सन 2024 ची उन्हाळी सुट्टी आणि शैक्षणिक वर्ष 2024-25 सुरू करण्यासंदर्भात सूचना दिल्या आहेत.



पुढील शैक्षणिक वर्ष सन 2024-25 मध्ये विदर्भ वगळता इतर सर्व विभागातील राज्य मंडळाच्या शाळा 15 जून रोजी सुरू करण्यात येणार आहेत. जून महिन्यातील विदर्भाचे तापमान विचारत घेत, विदर्भातील शाळा 1 जुलैपासून सुरू होणार आहेत, असे या परिपत्रकात नमूद केले आहे.


टिप्पण्या