shiv-parvati-marriage-rail-akl: रेल येथे देवाधिदेव महादेव व आदिशक्ती माता पार्वती यांचा लगन सोहळा; हजारों वर्षांची परंपरा




भारतीय अलंकार न्यूज 24

ॲड.नीलिमा शिंगणे जगड 

अकोला: सालाबाद प्रमाणे यंदाही वऱ्हाड प्रांतामधील आदिवासी कोळी महादेव बांधवांचे आराध्य दैवत देवाधिदेव महादेव व हिमकण्या आदिशक्ती माता पार्वती यांचा लगन सोहळा आदिवासी पारंपारिक, चालीरीती नुसार अत्यंत उत्साहात व हजारो भाविक भक्तांच्या उपस्थितीत मंगळवार 16 एप्रिल 2024 रोजी श्री. रेलेश्वर महादेव संस्थान रेल तालुका अकोट जिल्हा अकोला या ठिकाणी संपन्न होत आहे.   






भाविकांनी या नयनरम्य सोहळ्यास उपस्थित राहावे, असे आवाहन सुधाकर घुगरे (अध्यक्ष, श्री.रेलेश्र्वर महादेव संस्थान रेल.) यांनी केले आहे.





या सोहळ्या निम्मित मंदिर परिसर विद्युत रोषणाईने सजविण्यात आला आहे. दर्शनासाठी होणारी गर्दी लक्षात घेता मंदिर व्यवस्थापन समिती आणि पोलीसांनी योग्य ती खबरदारी घेतली आहे. हा सोहळा बघण्यासाठी पंचक्रोशीतील भाविक येथे मोठया संख्येने उपस्थित राहतात.



टिप्पण्या