paramilitary-forces-enter-akola: सण उत्सव व लोकसभा निवडणुक 2024 चे पार्श्वभुमीवर अर्ध सैनिक बलाच्या तुकडया अकोल्यात दाखल




ठळक मुद्दा 

अकोला पोलिसांचे अकोला शहरात पथसंचलन 





भारतीय अलंकार न्यूज 24

नीलिमा शिंगणे जगड 

अकोला: सण उत्सव आणि लोकसभा सार्वत्रिक निवडणुक 2024 चे कायदा व सुव्यवस्था बंदोबस्ताकरीता अकोला जिल्हा येथे CISF - 01 कंपनी, केरला KLSAP - 01 कंपनी,, RPF 01 कंपनी, SRPF 02 कंपनी अशा एकुण 05 कंपनी बंदोबस्ताकरीता प्राप्त झाले आहेत.


आज 09 एप्रिल रोजी दुपारी 1 वाजता पोलीस अधीक्षक बच्चन सिंह यांचे मार्गदर्शनात व अपर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे, उप विभागीय पोलीस अधिकारी शहर विभाग सतिश कुळकर्णी, प्रभारी पोलीस उप अधीक्षक श्री नाफडे यांचे उपस्थितीत केंद्रीय सुरक्षा बल व राज्य राखीव पोलीस बल यांचे अधिकारी व अंमलदार यांची बैठक घेवून लोकसभा निवडणुक 2024 वे अनुषंगाने जिल्हयाची भौगोलीक परिस्थीती, जिल्हयातील विधानसभा क्षेत्र व जिल्हयात आतापर्यंत निर्माण झालेल्या कायदा व सुव्यवस्था प्रश्ना संबंधाने मार्गदर्शन करून चर्चा करण्यात आली. याशिवाय नजीकच्या काळात साजरे होणारे विविध सण व जयंती उत्सव व सदर उत्सवा दरम्यानची परिस्थीती बाबत अवगत करण्यात आले. निवडणुक काळात निर्माण होणारी संभाव्य परिस्थीती याबाबत सविस्तर चर्चा करून मार्गदर्शन करण्यात आले.




यावेळी CISF, KLSAP (केरळ), RPF व राज्य राखीव पोलीस बलाचे अधिकारी व अंमलदार हजर होते. त्यांना अकोला जिल्हा पोलीस दलातर्फे स्मृतीचिन्ह देवून अकोला जिल्हयात त्यांचे स्वागत करण्यात आले. अकोला जिल्हयाची आठवण म्हणून सर्व कंपनीचे अधिकारी व अंमलदार यांचे सामुहिक फोटो घेवून बैठकीची सांगता करण्यात आली. 


शहरातील बाजारपेठ व मिश्र वस्ती भागातुन रूटमार्च 



आगामी सण उत्सव व निवडणुक प्रक्रीया शांततेत पार पाडण्याकरीता तसेच जनतेमध्ये भयमुक्त वातावरण निर्मिती करण्याकरिता बैठकीनंतर अकोला शहरात अकोला पोलीसांतर्फे रूट मार्चचे आयोजन सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास  पोलीस अधीक्षक  बच्चन सिंह यांचे नेतृत्वात करण्यात आले होते. 



शहरातील बाजारपेठ तसेच मिश्र वस्ती भागातुन रूट मार्चचे आयोजन करण्यात आले होते. त्याची सुरूवात अकोट स्टॅन्ड पासुन होऊन सुभाष चौक, ताजना पेठ, फतेह चौक, चांदेकर चौक, गांधी चौक,  सराफा बाजार चौक, कपडा बाजार चौक,  बियाणी चौक,  मामा बेकरी चौक,  लक्कड गंज,  दगडी पूल, अगरवेस,  अलका बॅटरी, जय हिंद चौक, किल्ला चौक, हरिहर पेठ येथुन मार्गक्रमण करीत हरिहर पेठ इदगाह येथे रूटमार्चचा समारोप करण्यात आला. दरम्यान शहरात वादळवारा आणि अवकाळी पावसाने हजेरी लावली होती. 




रूटमार्च मध्ये अपर पोलीस अधीक्षक  अभय डोंगरे, उप विभागीय पोलीस अधिकारी शहर विभाग सतिश कुळकर्णी, प्रभारी पोलीस उप अधीक्षक श्री नाफडे, स्थानिक गुन्हे शाखा अकोलाचे पोलीस निरिक्षक शंकर शेळके, शहर वाहतुक शाखेचे पोलीस निरिक्षक सुनिल किनेश तसेच राखीव पोलीस निरीक्षक गणेश जुमनाके व अकोला शहर विभागातील 08 पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी व 09 पोलीस उपनिरिक्षक, अर्ध सैनिक बलाचे एकुण 22 अधिकारी व 297 जवान तसेच अकोला शहरातील 159 पोलीस अंमलदार तसेच 01 QRT पथक, 03 RCP पथक, 16 दामीनी मार्शल, यांचा सहभाग होता.





कोणत्याही अफवांना बळी न पडता सण उत्सव शांततेत पार पडावे, अनुचित प्रकार दिसून आल्यास तात्काळ पोलीस विभागाशी संपर्क करावा, असे आवाहन पोलीस अधीक्षक बच्चन सिंह यांनी यावेळी संपुर्ण जिल्ह्यातील जनतेला केले आहे.

टिप्पण्या