lok-sabha-elections-2024-akl: ॲड. प्रकाश आंबेडकर यांचा प्रचंड जनसमुदायाच्या साक्षीने उमेदवारी अर्ज दाखल



भारतीय अलंकार न्यूज 24

ॲड. नीलिमा शिंगणे जगड 

अकोला: आज नामांकन अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी आपला नामांकन अर्ज दाखल केला. यावेळी त्यांच्या सोबत पत्नी प्रा. अंजली आंबेडकर, सुपुत्र सुजात आंबेडकर, पक्षाचे पदाधिकारी आणि मोठ्या संख्येत कार्यकर्ते उपस्थित होते.



टॉवर चौक येथील पक्ष कार्यालय पासून जिल्हाधिकारी कार्यालय पर्यंत रैली काढण्यात आली होती. यावेळी त्यांनी भाजप पक्षातील घराणेशाहीवर टीका केली. तर निवडणुकीत आपला विजय कशा प्रकारे होईल या संदर्भात आंबेडकर यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. आज वंचित तर्फे तयार करण्यात आलेल्या नवीन गाण्याचं सुद्धा लोकार्पण करण्यात आले.






नामांकन रॅली दरम्यान विविध समाजाच्या वतीने बाळासाहेब आंबेडकर यांचे पुष्प देवून स्वागत


वैद्यकीय डॉक्टर, अधिवक्ता व तृतीयपंथीच्या वतीने स्वागत





वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा  बाळासाहेब आंबेडकर यांचा उमेदवारी अर्ज हा प्रचंड जनसमुदायाच्या उपस्थितीत दाखल करण्यात आला. अर्ज दाखल करण्यासाठी वंचित बहुजन आघाडी जिल्हा पक्ष कार्यालय टॉवर चौक येथुन भव्य नामांकन रॅलीची सुरवात करण्यात आली. या रॅलीत ॲड प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर, प्रा. अंजली आंबेडकर, युवानेते सुजात आंबेडकर हे सहभागी झाले होते.  नामांकन रॅली फत्तेह चौक मार्गे न्यु क्लाथ मार्केट, खुले नाट्यगृह, पंचायत समिती अकोला मार्गे जिल्हाधिकारी कार्यालय येथे पोहचली. रॅलीत तिरंगा ध्वज व पक्षाचा ध्वज वगळता इतर कुठलेच ध्वज नव्हते, रॅली दरम्यान विविध समाजाच्या वतीने बाळासाहेब आंबेडकर यांना पुष्प देवून स्वागत करण्यात आले, सोबतच फुटपाथवरील किरकोळ विक्रेते यांनीही पुष्पगुच्छ व पेढे भरवत आंबेडकर यांना शुभेच्छा दिल्या. जिल्ह्यातील डॉक्टर, वकिल यांनीही स्वागत केले. या सोबतच तृतीयपंथी वर्गाने स्वागत करुन आशिर्वाद प्रदान केले. 




रॅलीत  राष्ट्रीय नेत्या प्रा. अंजली आंबेडकर,  सुजात आंबेडकर, युवा प्रदेशाध्यक्ष निलेश विश्वकर्मा, प्रदेश उपाध्यक्ष डॉ. धैर्यवर्धन पुंडकर, भारिप बहुजन महासंघाचे प्रदेशाध्यक्ष अशोक सोनोने, युवा प्रदेश महासचिव राजेंद्र पातोडे, महिला प्रदेश महासचिव अरूंधती शिरसाट, प्रदेश सदस्य अमित भुईगळ, प्रदेश उपाध्यक्ष गोविंद दळवी, पश्चिम विदर्भ महासचिव बालमुकुंद भिरड, जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे, जिल्हा महासचिव मिलींद इंगळे, महिला जिल्हाध्यक्ष प्रभा शिरसाट, जि. प. अध्यक्ष संगीता अढावू, युवा जिल्हाध्यक्ष श्रीमंत घोगरे, सम्यंक विद्यार्थी आंदोलनचे जिल्हाध्यक्ष धिरज इंगळे, ॲड. नरेंद्र बेलसरे,  गोपाल राऊत, प्रा. डॉ. संतोष हुशे, महानगर कार्याध्यक्ष मजहर खान, शंकरराव इंगळे, वंदना वासनिक, गजानन गवई, विकास सदांशिव, राजकुमार दामोदर, शोभा शेळके, निलोफर शहा, जि. प. उपाध्यक्ष सुनील फाटकर, समाजकल्याण सभापती आम्रपाली खंडारे, शिक्षण सभापती माया नाईक कृषी सभापती योगीता रोकडे, महिला व बालकल्याण सभापती रिजवाना परवीन, जि. प. सदस्य रामकुमार गव्हाणकर, सुशांत बोर्डे, अनंत अवचार, स्फृर्ती गावंडे, निता गवई, प्रमोदिनी कोल्हे, प्रगती दांडळे, निलेश उन्हाळे, शेख साबीर, पराग गवई, सचिन शिराळे,प्रशिक मोरे यांच्यासह जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच हजारोंच्या संख्येने नागरिक उपस्थित होते. 


बाळासाहेब आंबेडकर यांचा उमेदवारी अर्ज दाखल करतेवेळी प्रदेश महासचिव राजेंद्र पातोडे, विदर्भ महासचिव बालमुकुंद भिरड, अनिल जाधव प्रदेश सदस्य, जि. प. अध्यक्ष संगीता अढावू, जि. प. उपाध्यक्ष सुनील फाटकर, महानगर कार्याध्यक्ष मजहर खान, डॉ. हर्षवर्धन मालोकार, बळीराम चिकटे, संजय कासदे, अमर डिकाव, गजानन दांडगे आदी पदाधिकारी उपस्थित होते. 





उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालय बाहेर आयोजित सभेला बाळासाहेब आंबेडकर यांनी उपास्थित जन समुदायाला संबोधित केले.



टिप्पण्या