- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
file image
भारतीय अलंकार न्यूज 24
नीलिमा शिंगणे जगड
अकोला: उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ राजेश्वर नगरीमध्ये भाजपा शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस मनसे राष्ट्र लहुजी सेना कुणबी सेना मराठा महासंघ रिपाई आठवले गट कवाडे गट महायुतीचे उमेदवार अनुप धोत्रे यांच्या प्रचारार्थ रविवार दिनांक 21 एप्रिल रोजी दुपारी दीड वाजता अकोला क्रिकेट क्लब मैदान रेल्वे स्टेशन रोड टावर चौक परिसरात विशाल जाहीर सभेला संबोधित करण्यासाठी येत असल्याची माहिती भाजप सूत्रांनी दिली.
आपल्या कामकाजामुळे व धर्माध्यात्म कुशल नेतृत्व म्हणून ओळखले जाणारे प्रखर वक्ते राष्ट्र चेतनाचे पहेरी योगी आदित्यनाथ यांची विशाल सभा संदर्भात जय्यत तयारी राजेश्वर नगरीमध्ये महायुतीचे कार्यकर्ते येत असून वेगवेगळ्या व्यवस्थेची समित्या गठीत करण्यात आल्या असून सहा ठिकाणी पार्किंगची व्यवस्था तसेच विविध व्यवस्थांच्या संदर्भात जय्यत तयारी सुरू आहे.
अनेक राष्ट्र भक्तांची व मतदार संघातील नागरिकांची मागणी लक्षात घेता योगी आदित्यनाथ यांची विशाल सभा अकोल्यात होत आहे.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा