ural-fraud-case-akola-crime-: उरळ पोलिसांची धडाकेबाज कारवाई; लग्नाच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूक करणाऱ्या दोघांना अटक

बनावट विवाह करून मजुराची फसवणूक; महिला आरोपीसह साथीदार पोलिसांच्या ताब्यात




भारतीय अलंकार न्यूज 24

नीलिमा शिंगणे जगड 

अकोला : उरळ पोलीस स्टेशन हद्दीत बनावट लग्नाच्या माध्यमातून चार लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी पोलिसांनी धडाकेबाज कारवाई करत दोन आरोपींना अटक केली आहे. या कारवाईमुळे फसवणुकीच्या गुन्ह्याचा तपासाला वेग आला असून, या प्रकरणात आणखी काही बाबी समोर येण्याची शक्यता आहे.


नेमके प्रकरण काय?


पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी भाउसाहेब मच्छिद्र बनसोडे (वय 35 वर्षे, व्यवसाय मजुरी, रा. अखानी पोस्ट खेड, ता. कर्जत, जि. अहिल्यानगर) यांनी दिलेल्या तक्रारीवरून उरळ पोलीस स्टेशन येथे अप. क्र. 298/2026 अन्वये भारतीय न्याय संहितेच्या कलम 318(4), 3(5) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.


फिर्यादीसोबत शिल्पा मिलिंद अहिर (वय 30 वर्षे, रा. तारफाईल, जि. अकोला) या महिला आरोपीने बनावट लग्न केल्याचा आरोप आहे. त्यानंतर महिला आरोपी व तिच्या साथीदारांनी फिर्यादीकडून तब्बल ४ लाख रुपये घेऊन फसवणूक केल्याचे तक्रारीत नमूद आहे.


दोन्ही आरोपी अटकेत


सदर प्रकरणातील महिला आरोपी शिल्पा मिलिंद अहिर हिला पोलिसांनी दि. 21 एप्रिल 2026 रोजी अटक केली. त्यानंतर तिचा साथीदार आरोपी विनायक किसनराव गवई (वय 56 वर्षे, रा. ग्राम खांबोरा, ता. जि. अकोला) याला दि. 22 ऑगस्ट 2026 रोजी अटक करण्यात आली.


दोन्ही आरोपींना अटक केल्यानंतर या फसवणुकीच्या प्रकरणाचा पुढील तपास उरळ पोलीस करीत आहेत.


वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई


ही कारवाई पोलीस अधीक्षक अचिंत चांडक, अपर पोलीस अधीक्षक बी. चंद्रकांत रेड्डी आणि उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन पडघन यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.


उरळ पोलीस स्टेशनचे ठाणेदार  जनार्धन खंडेराव, पोलीस उपनिरिक्षक परमेश्वर केंद्रे, तसेच राजू जोंधरकर,  विजय चव्हाण, रघुनाथ नेमाडे, विकास राठोड, उमेश वाकोडे, रुक्मिण घोडके आणि पल्लवी काळे यांनी ही कारवाई केली.


ठळक मुद्दे


- बनावट लग्न करून फसवणूक केल्याचा आरोप

- फिर्यादीकडून ४ लाख रुपये घेतल्याचे तक्रारीत नमूद

- महिला आरोपीला २१ एप्रिल रोजी अटक

- साथीदार आरोपीला २२ ऑगस्ट रोजी अटक

- उरळ पोलिसांची धडाकेबाज कारवाई

- प्रकरणाचा पुढील तपास सुरू


टिप्पण्या