lok-sabha-election-2024-mh: राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान 53.51 टक्के; नितीमत्ता हरवलेलं राजकारण जबाबदार!




भारतीय अलंकार न्यूज 24

ॲड. नीलिमा शिंगणे जगड 

अकोला: राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान आज 26 एप्रिल 2024 रोजी सकाळी 7 वाजता पासून सुरु झाले आहे. 8 मतदारसंघात सायंकाळी 5 वाजेपर्यंत सरासरी 53.51 टक्के मतदान झाले आहे. ही आकडेवारी पाहता राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान असमाधानकारक झाले असल्याच्या प्रतिक्रिया नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे.


दुसऱ्या टप्प्यातील एकूण 8 लोकसभा मतदार संघनिहाय टक्केवारी 



वर्धा – 56.66 टक्के


अकोला - 52.49टक्के


अमरावती - 54.50 टक्के


बुलढाणा - 52.24 टक्के


हिंगोली - 52.03 टक्के


नांदेड - 52.47 टक्के


परभणी -53.79 टक्के


यवतमाळ – वाशिम – 54.04 टक्के



नीतिमत्ता हरवलेले राजकारण 




मतदान एवढे कमी होण्याचे कारण म्हणजे प्रशासकिय यंत्रणा केवळ कागदोपत्री मतदान जनजागृती मोहीम राबविणे, मतदान प्रक्रिया मध्ये एव्हीम मशीन मध्ये बिघाड होणे, दोन दोन तास मतदान प्रक्रिया ठप्प असणे, मतदारांची नावे मोठ्या प्रमाणात डिलीट होणे, जिवंत मतदार यांना मृत दर्शविणे,  अशा अनेक तक्रारी करतं मतदार मतदान केंद्रावर उभे राहतात, संबंधीत अधिकारी यांचेकडे तक्रार केली तरी तक्रारीचे ताबडतोब समाधान होत नाही,असा सूर आता नागरिकांमधून येत आहे.


तसेच यावेळी अवकाळी पावसाचे वातावरण असल्याने कुठे पाऊस पाणी तर कुठे कडक उन असल्याने अनेकांनी घराबाहेर जाणे टाळले. 


तर सर्वात महत्वाचे म्हणजे लोकांना राजकारण आणि राजकिय पक्षांवर, नेत्यांबाबत कमालीची अनास्था आहे. याला कारण अलीकडचे महाराष्ट्रातील नीतिमत्ता हरवलेली राजकिय परिस्थिती आणि राजकारण होय, अशी चर्चा आता जनमाणसात होत आहे.


टिप्पण्या