lok-sabha-election-2024-akola: योगी आदित्यनाथ यांची अकोल्यात आयोजित सभा रद्द







भारतीय अलंकार न्यूज 24

नीलिमा शिंगणे जगड 

अकोला : लोकसभा सार्वत्रिक निवडणुक 2024 च्या दुसऱ्या टप्प्याच्या मतदानाला काही दिवस शिल्लक राहिले असून प्रचाराची रणधुमाळी जोरात सुरू आहे. 21 एप्रिलला अकोल्यात भाजपचे उमेदवार अनुप धोत्रे यांच्या प्रचारार्थ उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची सभा आयोजित करण्यात आली होती. मात्र, योगी आदित्यनाथ यांनी या सभेकडे पाठ फिरवली आहे. अकोल्यातील अकोला क्रिकेट क्लब मैदानावर होणारी त्यांची 21 एप्रिलची सभा रद्द करण्यात आली आहे.





या सभेकरिता गेल्या तीन दिवसांपासून भाजप तर्फे जय्यत तयारी करण्यात आली होती, मात्र ऐनवेळी ही सभा रद्द करण्यात आली असून, अकोला क्रिकेट क्लब मैदान येथे मंडप उभारणीचे काम देखील थांबविण्यात आले आहे.





दरम्यान, भाजप उमेदवाराच्या प्रचारार्थ अद्यापही भाजपचे कोणतेही मोठे नेते अकोल्यात आले नाही हे विशेष. योगी आदित्यनाथ यांची ही सभा कोणत्या कारणाने रद्द करण्यात आली, याच स्पष्ट उत्तर भाजपकडून मिळालं नसून योगी आदित्यनाथ यांनी बऱ्याच सभा रद्द केल्या असल्याचे कारण समोर येत आहे.



New update 

अमित शाह 24 ला अकोल्यात 


23 एप्रिल रोजी राज्याची उपमुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस अकोट येथे जाहीर सभा.


चंद्रशेखर बावनकुळे 22 तारखेला अकोल्या तेल्हारा वाडेगाव अकोला येथे बैठका विविध समाजातील सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांची भेटीगाठी.


24 एप्रिल बुधवार रोजी देशाचे गृहमंत्री नामदार अमित शहा यांची क्रिकेट क्लब येथे जाहीर सभा होणार असल्याची माहिती भाजपा महायुती सूत्रांनी दिली.

टिप्पण्या