- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
lok-sabha-election-2024-akola: संविधान अबाधित ठेवण्यासाठी संभाजी ब्रिग्रेड महाविकास आघाडी सोबत- सौरभ खेडेकर यांची अकोल्यात घोषणा; डॉ अभय पाटील यांच्या समर्थनार्थ संभाजी ब्रिगेड ताकदीनिशी मैदानात
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
भारतीय अलंकार न्यूज 24
नीलिमा शिंगणे जगड
अकोला: देशातील लोकशाही व संविधानासाठी भारतीय जनता पक्ष व राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हे धोकादायक असल्याचा आरोप करीत, या लोकसभा सार्वत्रिक 2024 निवडणुकीत संभाजी ब्रिगेड ही समतेच्या विचारधारेचे जतन करण्यासाठी व संविधानाचे मूल्य जपण्यासाठी राज्यभरात महाविकास आघाडीच्या पाठीशी राहणार असून त्यांच्या प्रचारात ताकदीनिशी उतरणार असल्याची घोषणा संभाजी ब्रिगेडचे प्रदेश महासचिव सौरभ खेडेकर यांनी केली.
स्थानीय जुन्या आरटीओ कार्यालय परिसरातील संभाजी ब्रिगेड कार्यालयात संभाजी ब्रिगेडची पत्रकार परिषद सोमवारी संपन्न झाली. यावेळी खेडेकर यांनी घोषणा केली.
गत अनेक वर्षापासून राज्यात पुरोगामी चळवळ गतिमान करणाऱ्या संभाजी ब्रिगेडचे राजकीय पक्षात परिवर्तन हे सन 2016 मध्ये झाले. तेव्हापासून संभाजी ब्रिगेड भारतीय जनता पक्षाच्या विचारसरणीवर आपली तीव्र प्रतिक्रिया उमटवत आहे. या देशात संविधान बदलण्याची भाषा होत आहे. महागाई व बेरोजगारीने संपूर्ण देश होरपळून निघत आहे. महिलांच्या सुरक्षितेचा प्रश्न निर्माण होत आहे.देशातील ऐंशी टक्के जनता भारतीय जनता पक्षाच्या राजवटीने त्रासून गेली आहे.म्हणून नवे विकासाचे मुद्दे घेऊन संभाजी ब्रिगेड महाविकास आघाडीच्या समवेत निवडणूक प्रचारात उतरत असून अकोल्यातही महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ अभय पाटील यांच्या समर्थनार्थ संभाजी ब्रिगेड ताकदीनिशी प्रचारात उतरत असून त्यांचा प्रचार व प्रसार करण्यासाठी शेकडो संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते सेवारत राहणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
संभाजी ब्रिगेड ने चंद्रपूर ,वर्धा, यवतमाळ ,अमरावती आदि लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा प्रचार करणे सुरू केले आहे. राज्यात महाविकास आघाडीसाठी पोषक वातावरण असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते कपिल ढोके यांनी डॉ अभय पाटील यांना संभाजी ब्रिगेड आपला जाहीर पाठिंबा देत असल्याचे नमूद करीत संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांचे स्वागत केले. यावेळी संभाजी ब्रिगेडच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी आपले मत व्यक्त करीत डॉ अभय पाटील यांच्या प्रचार अभियानात जोमाने काम करू असा निर्धार व्यक्त केला.
पत्रकार परिषदेत ब्रिगेडचे प्रदेश कार्याध्यक्ष डॉ गजानन पारधी, विभागीय अध्यक्ष गजानन भोयर, महानगर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष डॉ प्रशांत वानखडे, काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते कपिल ढोके, युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष आकाश कवडे ,महानगर काँग्रेस कमिटीचे महासचिव कपिल रावदेव, युवक काँग्रेसचे प्रदेश पदाधिकारी सागर कावरे, संभाजी ब्रिगेडचे बुलढाणा जिल्हा अध्यक्ष योगेश पाटील, जिल्हा प्रभारी गणेश अंदुले, कार्यकारी जिल्हाध्यक्ष नमन आंबेकर, युवक जिल्हाध्यक्ष निखिल खानझोडे, जिल्हा सचिव हर्षल देशमुख, आकाश कराळे, सुरज महल्ले, जिल्हा उपाध्यक्ष दत्ता कौशल, सोनू पानझाडे, रफिक कुरेशी, फरहान कुरेशी, अदनान शेख, तेल्हारा तालुका अध्यक्ष चेतन अकोटकर, कोषाध्यक्ष प्रशिक बोधडे समवेत संभाजी ब्रिगेडचे प्रदेश, विभागीय, जिल्हा व तालुका स्तरावरील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Akola
constitution
equality
ideology
Lok Sabha election
Mahavikas Aghadi
Sambhaji Brigade
Saurabh Khedekar
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा