lok-sabha-election-2024-akl: अकोल्यात मुख्य लढत भाजप आणि काँग्रेस मध्ये असून तिसरा उमेदवार कुठं आहे हे शोधावं लागेल- मुकुल वासनिक यांचे वक्तव्य





भारतीय अलंकार न्यूज 24

नीलिमा शिंगणे जगड 

अकोला : अकोल्याच्या लोकसभेच्या निवडणुकीत मुख्य लढत भाजप आणि काँग्रेस मध्ये असून तिसरा उमेदवार कुठ आहे हे शोधावं लागेल, असा टोला अप्रत्यक्षरिते काँग्रेसचे नेते मुकुल वासनिक यांनी प्रकाश आंबेडकर यांना लगावला. वंचित बहुजन आघाडीला सोबत घेण्याचा आमचा विचार होता, मात्र का सोबत आले नाही याच कारण आपण मतदारांनीच शोधून काढावे, असे वक्तव्य राष्ट्रीय काँग्रेसचे महासचिव, गुजरात प्रभारी, माजी केंद्रीय मंत्री तथा खासदार मुकुल वासनिक यांनी केले.






ते आज दुपारी अकोल्यात महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. अभय पाटील यांच्या प्रचारार्थ पातुर येथे बोलत होते.





नवनीत राणा बद्दल शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे नेते संजय राऊत यांनी केलेल्या वक्तव्यावर बोलताना, राज्यात अनेक प्रश्न प्रलंबित असून त्यावर चर्चा झाली पाहिजे असे म्हणत संजय राऊत यांच्यावर मुकुल वासनिक यांनी यावेळी सूचक वक्तव्य केले.




नागपूर मधून भाजपाचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी हे निवडून येणार नसल्याचा ही वक्तव्य मुकुल वासनिक यांनी केला आहे. 


यावेळी उमेदवार डॉ. अभय पाटील यांनी उपस्थित मतदारांशी संवाद साधून काँगेसचे धोरण आणि भूमिका आपल्या भाषणातून मांडली.



 


सभेला महाविकास आघाडीचे नेते, पदाधिकारी, सहकारी, कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.




टिप्पण्या