- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
lok-sabha-election-2024-akl: मनसेच्या पाठिंब्यामुळे मुंबई मधील दक्षिण भारतीय आणि बिहारी लोकांमध्ये भीतीचे वातावरण- प्रकाश आंबेडकर यांचे वक्तव्य
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
भारतीय अलंकार न्यूज 24
नीलिमा शिंगणे जगड
अकोला : वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना ने भारतीय जनता पार्टीला बिनशर्त दिलेल्या पाठिंब्यावर टीका केली आहे. मनसेच्या पाठिंब्यामुळे मुंबई मधील दक्षिण भारतीय आणि बिहारी लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असल्याचं आंबेडकर म्हणाले.
प्रकाश आंबेडकर यांनी आज पत्रकार परिषद बोलविली होती. यावेळी ते बोलत होते.
कपडे फाडण्यात एक्स्पर्ट !
काँगेस नेते विजय वडेट्टीवार यांनी काही दिवसांपूर्वी प्रकाश आंबेडकरांवर टीका केली होती, यावर प्रकाश आंबेडकरांनी प्रतिउत्तर देत विजय वडेट्टीवार यांनी वांचितच्या नांदी लागू नये, कारण आम्ही कपडे फाडण्यात एक्स्पर्ट आहोत, असं आंबेडकर म्हणाले.
तर सुप्रिया सुळे यांना दिलेल्या पाठिंब्याचा मोबदला काही मिळणार का, या प्रश्नावर आंबेडकरांनी मौन बाळगले.
प्रतीक पाटील यांनी घेतली प्रकाश आंबेडकर यांची भेट
सांगलीतील काँग्रेसचे नाराज उमेदवार विशाल पाटील यांचे छोटे भाऊ प्रतीक पाटील यांनी आज प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली. या भेटीमुळे आता विशाल पाटील वंचितचे उमेदवार असल्याची चर्चा रंगत आहे.
विशाल पाटील सांगली यांचे बंधू माजी केंद्रीय मंत्री प्रतीक पाटील यांनी अकोल्यात वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली.
यावेळी वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष प्रा.सोमनाथ साळुंखे, अय्याज नाईकवाडी आदी उपस्थित होते.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा