lok-sabha-election-2024-akl: मलकापूरच्या सभेत ॲड.आंबेडकरांनी मोदींवर सोडले टिकांचे सहस्त्र बाण !



ॲड.प्रकाश आंबेडकर यांच्या मलकापूर येथील सभेतील काही ठळक मुद्दे

*1985 पासून मी निवडणुका लढत आहे. मात्र आतापर्यंत घटना बदलण्याची निवडणूक कधी पाहिली नाही या निवडणुकीत घटना बदलण्याची चर्चा होत आहे.

*भाजपाला 400 चा नारा म्हणजे संविधान बदलण्याचा आहे.

*मोदींच्या भानगडी बाहेर पडू नये यासाठी विरोधकांना संपवण्याचा प्रयत्न सुरू आहे.

*मोदी 117 वर्षाचे होईपर्यंत राज्य करणार असं म्हणत आहे. मोदींना वेड लागला आहे

*मोदींना लोकशाही संपून हुकूमशाही करायची आहे.

*उज्वला गॅसच्या माध्यमातून गाजर दाखवलं मात्र खायला दिलं नाही.

*देशाची वाटचाल हुकूमशाहीकडे 

*प्रकाश आंबेडकर यांनी आपल्या भाषणात भाजपवर हजार टीका केल्यात. मात्र, काँग्रेसवर एकही शब्द बोलले नाहीत.

*सभेला नागरिकांची प्रचंड गर्दी 






भारतीय अलंकार न्यूज 24

ॲड. नीलिमा शिंगणे जगड 

अकोला: भारत देशामध्ये एककल्ली कार्यक्रम सुरू असून मोदींची  हुकूमशाही पद्धतीने वाटचाल सुरू आहे, त्यांचे सरकार हे वंचिताचे सरकार नाही, असा आरोप वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केला.



बुधवारी सायंकाळी अकोला येथील मलकापूर भागात मलकापूर चौकात आयोजित जाहिर सभेत ते बोलत होते. 



ते म्हणाले की, देशातील सरकार हुकूमशाही कडे वाटचाल करीत आहे. नरेंद्र मोदी यांना सत्तेत विरोधक नको आहेत. ते सत्तेवर आल्यापासून वंचित, बहुजन आणि सर्वसामान्य शेतकरी लोकांची बोळवण सुरू आहे. देशातला सगळ्यात खोटा बोलणारा माणूस म्हणून नरेंद्र मोदी यांची ओळख आहे. नरेंद्र मोदी यांना देशाची घटना बदलायची आहे म्हणूनच ते चारशे प्लस अशा घोषणा देत आहेत. सत्तेत येण्यासाठी फक्त 272 खासदारांची गरज आहे मग 400 प्लस बोलण्याचे कारण काय ?  असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.



ते पुढे म्हणाले की, देशातील हे सरकार हिंदूचे म्हटले जात असले तरी ते हिंदूच्या विरोधात आहे. हे आपण समजून घ्यायला पाहिजे. मोदी शासनाने ओबीसी शिष्यवृत्ती बंद केली. उज्वला गॅस योजना आणून सर्वसामान्य गृहिणींची फसवणूक केली. हे सरकार वंचित, बहुजन,  शेतकरी या लोकांचे नसून व्यापाऱ्यांचे सरकार आहे, असा आरोप ॲड. आंबेडकर यांनी या जाहीर सभेत केला. 



त्यांनी सांगितले की, नरेंद्र मोदी यांनी आजपर्यंत आपल्या भाषणात कधीही मी घटना बदलणार नाही असा उल्लेख केला नाही, असं जर ते कधी बोलले असतील, तर मला दाखवा. याचा अर्थ त्यांना घटना बदलायची आहे, असे समजा. असे आंबेडकर यांनी सांगितले.



वंचित, शोषित, कामगार, शेतकरी, महिला यांच्या प्रश्नाबाबत मोदी शासन अजिबात गंभीर नाही. त्यांना देशातील मोठा व्यापाऱ्यांची काळजी आहे. असे ते म्हणाले. 




या कार्यक्रमाला प्रकाश आंबेडकर यांच्या सोबत बालमुकुंद भिरड, दामोदर जगताप, किरण बोराखडे, शेख साबीर, माया इंगळे, वैशाली सदांशिव, किशोर बळी, पराग गवई, दीपक गवई बबलु पातोडे, बाबाराव दंदी, सचिन इंगळे, सुवर्णा जाधव, अविनाश वानखडे, विकास सदांशिव यांच्यासह बारा बलुतेदार व अठरापगड जातीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थिती होते.






टिप्पण्या