lok-sabha-election-2024-akl: महायुतीच्या विकसित भारत संकल्प नामाचे प्रकाशन; कृषी, शैक्षणिक, आरोग्य आणि औद्योगिक विकासावर भर




भारतीय अलंकार न्यूज 24

नीलिमा शिंगणे जगड 

अकोला : अकोला लोकसभा मतदार संघात महायुतीने आपला जाहीरनामा मंगळवारी प्रकाशित केला आहे. भाजप प्रचार कार्यालयात भाजप पदाधिकारी आणि महायुतीच्या घटक पक्षांच्या नेत्यांसोबत अकोला लोकसभा मतदारसंघाच्या विकासासाठी ‘विकसित भारत संकल्पनामा’ जाहीर केला आहे. या जाहीरनामात महायुतीचे उमेदवार अनुप धोत्रे यांनी येत्या 5 वर्षांसाठी कृषी, शैक्षणिक, आरोग्य आणि औद्योगिक विकासावर भर दिला आहे. 





जाहीरनामातील ठळक वैशिष्ट्ये 


१) ग्रामीण कृषी अर्थव्यवस्था बळकटीकरण व रोजगार निर्मितीसाठी कृषी उत्पादन प्रक्रिया उद्योग उद्योजकता प्रशिक्षण व पणन व्यवस्था निर्माण करण्याकरिता वैयक्तिक तसेच बचत गटांना चालना देणे.


२) मतदारसंघातील सर्व औद्योगिक वसाहतींचा विस्तार करून कृषी प्रक्रिया उद्योगांना चालना देणे.


३) अकोला येथील विमानतळ सुरू करणे.


४) पश्चिम विदर्भात पाणी उपलब्धता करण्यासाठी पैनगंगा - नळगंगा नदीजोड प्रकल्प प्राथम्याने हाती घेणे.


५) पूर्णा व काटेपूर्णा नदी खोऱ्यातील सर्व बॅरेज पूर्ण करणे तसेच पूर्ण झालेल्या बॅरेज अंतर्गत प्रत्यक्ष सिंचनाचा लाभ सुरू करणे..


५) अकोला शहराला शैक्षणिक हब बनविणे.


६) अकोला शहरातील अद्यावत सांस्कृतिक भवन व ऑलम्पिक दर्जाचा जलतरणतलाव तातडीने सेवेत रजू करणे.


७) जिल्हा तसेच तालुकास्तरावर अभ्यासिका स्थापन करणे.


८) अकोला शहरातील राजराजेश्वर मंदिराचा तीर्थक्षेत्र पर्यटन प्रकल्पाअंतर्गत विकास करणे.


९) अकोला येथे संत गाडगेबाबा विद्यापीठ अमरावती या विद्यापीठाचे उपकेंद्र सुरू करणे.



१०) अकोला येथून रेल्वे गाड्या सुरू करण्याकरिता अकोला रेल्वे स्टेशनवर पीट लाईनचे बांधकाम करणे.



११) जिल्हा परिषद , महानगरपालिका , नगरपालिका , शासकीय शाळांमध्ये शिक्षणाचा दर्जा अद्यावत व उन्नत करणे.


या आकरा बाबींचा समावेश आहे.

केंद्र आणि राज्य सरकारला अपेक्षित विकास नामा महायुतीने तयार केला. याकरिता महायुतीने वीस हजार नागरिकांची संवाद साधून त्यांचे मत जाणून घेतले. याकरिता अकोला जिल्ह्यात ठिकठिकाणी पेट्या लावण्यात आल्या होत्या. हा मत संग्रह व नागरिकांच्या संकल्पना राज्य व केंद्र सरकारकडे पाठविण्यात आला आहे.




 


रतनलाल प्लॉट येथील भाजपा शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस रिपाई रासप महायुतीचे उमेदवार अनुप धोत्रे यांच्या प्रचार कार्यालयात महायुतीचा हा विकसित संकल्पनामा प्रकाशन कार्यक्रम पार पडला. 



कार्यक्रमाचे अध्यक्ष भाजपा प्रदेश सरचिटणीस रणधीर सावरकर होते.  याप्रसंगी आमदार अमोल मिटकरी, आमदार वसंत खंडेलवाल, आमदार हरीश पिंपळे, शिवसेना उपनेते गोपीकिशन बाजोरिया, विजय देशमुख, कृष्णा अंधारे, किशोर पाटील, तेजराव थोरात, जयंत मसने, संदीप पाटील, अश्विन नवले, विठ्ठल सरप, डॉक्टर रणजीत सपकाळ, श्रावण इंगळे, डॉक्टर अशोक ओळंबे, हरीश आलीमचंदानी, वसंत बाछुका, कृष्णा शर्मा, उमेश मालू यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी मान्यवरांची समयोचीत भाषण झाली.


कार्यक्रमाचे प्रास्ताविक आमदार हरीश पिंपळे यांनी केले. संचालन गिरीश जोशी यांनी केले.आभार विठ्ठल सरप यांनी मानले, अशी माहिती गिरीश जोशी यांनी दिली.


टिप्पण्या