hanuman-janmotsav-akl-2024: हनुमान जयंतीच्या पूर्वसंध्येला शहरातून निघाली हनुमान जन्मोत्सव भव्य शोभायात्रा; सजीव देखावे ठरले आकर्षण




भारतीय अलंकार न्यूज 24

ॲड. नीलिमा शिंगणे जगड 

अकोला: राज राजेश्वर नगरीत मागील आठ वर्षापासून दरवर्षी हनुमान जयंतीच्या पर्वावर जन्मोत्सव उपक्रम व भव्य शोभायात्रा आयोजित करणाऱ्या हनुमान जन्मोत्सव समितीच्या वतीने यावर्षी देखील हनुमान जन्मोत्सवाच्या पूर्वसंध्येवर महानगरात हनुमंताची भव्य शोभायात्रा आयोजित करण्यात आली. यामध्ये सजीव हनुमंताची झाकी तथा बाल वानरसेना वेशभूषा, श्री प्रभू रामचंद्रांची भव्य मूर्ती नागरिकांसाठी आकर्षण ठरले. श्री हनुमान जन्मोत्सव समितीचे अध्यक्ष अरविंद शुक्ला यांच्या नेतृत्वात ही शोभायात्रा शहराच्या प्रमुख मार्गाने निघाली. राजेश्वर मंदिर येथुन शोभायात्रेचे प्रारंभ होवून सिटी कोतवाली चौक परिसरातील हनुमान मंदिर येथे समापन कऱण्यात आले.



हनुमान जन्मोत्सव समितीचे अध्यक्ष अरविंद शुक्ला, युवा नेते कृष्णा शर्मा, मुख्य संयोजक अविनाश देशमुख, जेष्ठ समाजसेवी रामप्रकाश मिश्रा, उद्योजक अजय सेंगर, मार्गदर्शक माजी आमदार बबन चौधरी, रमाकांत खेतान, प्रा.संतोष हुसे, पंकज साबळे, सागर कावरे, आकाश कवडे, मनोज शाहू यांच्या नेतृत्वात हनुमान जन्मोत्सव शोभायात्रा श्री राज राजेश्वर मंदिर येथून प्रारंभ कऱण्यात आली.



समितीच्या वतीने मंगळवार 23 एप्रिल रोजी हनुमान जयंतीचा मुख्य सोहळा साजरा करण्यात आला. तर हनुमान जयंतीच्या पूर्वसंध्येला म्हणजेच सोमवार 22 एप्रिल रोजी सायंकाळी 5 वाजता श्री राजराजेश्वर मंदिरापासून  शोभायात्रा काढण्यात आली.  शोभायात्रा जयहिंद चौक, सिटी कोतवाली, गांधी चौक अशी मार्गक्रमण करीत वसंत टॉकीज मार्गे सिटी कोतवाली परिसरातील हनुमान मंदिराजवळ पोहचली. याठिकाणी  हनुमान पूजन व महाआरती करुन शोभायात्रेचे भक्तिभावात समापन करण्यात आले. 


शोभायात्रेत राम दरबारात हनुमंताची प्रतिमेस रथात विराजमान करून हा रथ भक्ताद्वारे ओढण्यात आला. तसेच शोभायात्रेत चालती फिरती हनुमंताची सजीव झाकी हे आकर्षणाचे केंद्र ठरली. लतीश गोटफोडे यांनी हनुमंताची वेशभुषा साकारली होती. रेणुका भजन मंडळ, मोठी उमरी भजन मंडळ, ज्ञानेश्वरी महीला मंडळ शिवसेना वसाहत यांच्या सह दोनशे महिला भजनी मंडळ, टाळकरी मंडळ  रामनामाचा गजर करीत शोभायात्रेत सहभागी झाले होते. तर वाल्मिकी नगर , शिवाजी नगर येथील बच्चे कंपनीची वानरसेना लक्षवेधी ठरली. 16 फूट उंच श्री रामचंद्राची प्रतिमा शोभायात्रेचे आकर्षणं ठरली. शोभायात्रेत शहरातील हनुमान भक्त, नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.


हनुमान जन्मोत्सव निमित्त समितीच्या वतीने चिमुकल्यांसाठी मोफत बाल हनुमान वेशभूषा स्पर्धा आयोजित केली होती. स्पर्धा गांधी चौक येथे समितीच्या स्वागत मंडपात घेण्यात आली. स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.



हनुमान जन्मोत्सव यशस्वी करण्यासाठी अजय गावंडे, आनंद वानखडे, राजेश राऊत, आकाश कवडे, अंकुश भेंडेकर, विशाल डिक्कर, योगेश बुंदेले, निशिकांत बडगे, पराग कांबले, विनोद नालट, अश्विन पांडे, दत्ता देशमुख, आशीष ढोमणे, गोविंद बागडी, गणेश कलसकर, ॲड. ओम खंडारे, संजय देशमुख, अश्विन देशमुख, अंकुर तायडे, कार्तिक पोडाले, निशांत जाधव, प्रकाश जड़िया, आकाश ठाकुर, ॲड. अनिल शुक्ला, निरंजन चव्हाण, राजाराम मात्रे, सागर पिंपले, प्रितेश ठाकरे, गजानन ढोरे, देशमुख, विनोद मराठे, संगीता आत्राम, जया देशमुख, सविता आढाव, वर्षा शिंदे वंदना गोमासे आदींनी परिश्रम घेतले.







.

टिप्पण्या