gudhi-padwa-2024-festival-akl: चैत्र शुक्ल प्रतिपदेला हिंदु नववर्षाचे स्वागत: संस्कृती संवर्धन समीतीचे आयोजन, पारंपरिक वेशभूषेत सहभागी होण्याचे आवाहन




भारतीय अलंकार न्यूज 24

ॲड. नीलिमा शिंगणे जगड 

अकोला: शहरात संस्कृतिक क्षेत्रात अग्रेसर असलेल्या संस्कृती संवर्धन समितीच्या वतीने चैत्र शुक्ल प्रतिपदा अर्थात गुढीपाडवा मंगळवार 09 एप्रिल रोजी नवीन वर्षाचे स्वागत करण्याकरिता नववर्ष स्वागत यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. 




स्थानिक हॉटेल ग्रीनलँड कॉटेज येथील सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत संस्कृती संवर्धन समितीचे अध्यक्ष प्रा. नितीन बाठे, माजी अध्यक्ष डॉ. आर. बी. हेडा,कार्याध्यक्ष हरिष आलीमचंदानी यांनी याबाबत विस्तृत माहिती दिली.


                          

स्वागत यात्रेचा प्रारंभ अकोला नगराचे आराध्य दैवत श्री. राज राजेश्वर मंदिरातून 9 एप्रिल रोजी सकाळी 7 वाजता महापूजेने होणार असून, त्यानंतर ही यात्रा काळा मारोती, सिटी कोतवाली चौकातून मोठे राम मंदिर मार्गे जुना कपडा बाजार, जैन मंदिर,गांधी चौक, तहसील ऑफिस,श्री.राणी सती मंदिर, श्री. गुरुद्वारा प्रबंधक समिति न्यू राधाकिसान प्लॉट मार्गे अशोक वाटिका येथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून मदनलाल धिंग्रा चौकातून टावर चौक,रतनलाल प्लॉट चौक,नेकलेस रोड मार्गे सिव्हिल लाइन चौकातून जवाहर नगर चौक, बारा ज्योतिर्लिंग मंदिर तेथून राऊत वाडी मार्गे जठारपेठ चौकातून सातव चौक मार्गे बिर्ला ले आऊट मधील जलाराम मंदिर येथून मार्गक्रमण करत समारोप बिर्ला राम मंदिर येथे महाआरतीने होणार आहे. तत्पूर्वी तेथे रामरक्षा पठण देखील होणार आहे. या यात्रेतील मार्गात येणार्‍या सर्व मंदिरांना ध्वज प्रदान कार्यक्रम होणार आहेत. यावर्षी लोकसभेची निवडणूक असल्याने मतदाना बाबत जनजागृती करण्याकरिता यात्रेतील सहभागी नागरिक विविध प्रकारचे फलक घेऊन मतदान करण्याचे आवाहन करणार आहेत, या यात्रेत अकोळ्यातील नागरिक पारंपरिक वेशभूषेत,फेटे घालून सहभागी होणार आहेत. तसेच यात्रेत मर्यादा पूरुषोत्तम प्रभू श्रीराम,सीता माई,लक्ष्मण,राम भक्त हनुमान यांचा राम दरबार विशेष आकर्षण राहणार आहे.  संस्कृती संवर्धन समिती अकोल्यात विविध प्रकारचे भारतीय संस्कृती संबंधी विषयांवर कार्यक्रम आयोजित करत असते,ज्यात प्रामुख्याने वर्ष प्रतिपदा अर्थात हिंदू नूतन वर्षाच्या प्रारंभी अकोला शहरातून नववर्ष स्वागत यात्रा आयोजित करत असते. या यात्रेत अकोल्यातील सर्व स्तरातून भरघोस प्रतिसाद मिळत असतो. या निमित्ताने शहरामध्ये जन जागृती करण्यात संस्कृती संवर्धन समितीचे मोठे योगदान आहे.




या नववर्ष स्वागत यात्रेत अकोल्यातील सर्व राष्ट्र प्रेमी नागरिक बंधु भगिनींनी सहपरिवार उपस्थित राहावे असे आवाहन समितीचे अध्यक्ष प्रा. नितीन बाठे, कार्याध्यक्ष हरिष आलीमचंदानी, स्वागताध्यक्ष पुरुषोत्तम मालाणी, स्वागत समितीचे उपाध्यक्ष नीलेश देव, निकेश गुप्ता, नंदकिशोर आवारे, स्वानंद कोंडोलीकर, राम भिरड, महिला संयोजिका सोनल ठक्कर, मीनाक्षी आपोतीकर, रश्मी कायन्दे, प्रचार प्रमुख समीर थोडगे आदींनी केले आहे.




                           

पत्रकार परिषदेला संस्कृती संवर्धन समितीचे महेश जोशी, ॲड. मोतीसिंह मोहता, हेमेंद्र राजगुरू, संस्कार भारतीचे निनाद कुळकर्णी, पंकज सादराणी आदी  उपस्थित होते.

टिप्पण्या