- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
भारतीय अलंकार न्यूज 24
अकोला: जिल्ह्यातील बाळापुर तालुका अंतर्गत असलेल्या बटवाडी बुजरुक येथे काल रात्री हत्येची घटना घडली असल्याचे उघडकिस आले. येथील चाळीस वर्षीय नितीश आखरे रात्री दोन वाजताच्या सुमारास घराबाहेर झोपले असता, काही अज्ञात आरोपींनी त्यांच्यावर धारदार शास्त्राने वार केला. यात त्यांचा जागीच मृत्यू झाल्याचे समजते. दरम्यान रात्री तीन वाजताच्या च्या सुमारास त्यांच्या पत्नी त्यांना मजुरी कामावर जाण्याकरिता उठवायला गेल्या असता हा गंभीर प्रकार त्यांच्या निर्देशनास आला.
बटवाडी बु. येथील रहिवासी नितीश आखरे वय 40 वर्षे हे खाजगी वाहनावर मजुरीचा रोजगार करीत होते. मध्यरात्री दरम्यान ते घराबाहेर झोपले असता, 10 ते 12 अज्ञात आरोपींनी त्यांच्यावर धारदार शास्त्राने वार करीत त्यांची अत्यंत निर्दयतेने हत्या केली. रात्री तीनच्या सुमारास त्यांची पत्नी त्यांना कामावर जाण्याकरिता उठवायला गेल्या असता त्यांना रक्ताच्या थारोळ्यात त्यांचे पती नितीन आखरे पडून असल्याचे दिसून आले. सदरचा गंभीर प्रकार त्यांच्या निर्देशनास आल्यानंतर त्यांनी मदतीसाठी आरडाओरड केली. यानंतर गावकऱ्यांना ही घटना कळली.
यानंतर घटनेची माहिती तात्काळ बाळापुर पोलिसांना देण्यात आली, घटनेची माहिती मिळताच बाळापूर पोलीस स्टेशन ठाणेदार अनिल जुमळे आपल्या ताफ्यासह घटनास्थळी पोहचले. घटनास्थळाचा पंचनामा करून पीडितचा मृतदेह बाळापुर ग्रामीण रुग्णालय येथे शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला. मिळालेल्या माहितीनुसार नितीश आखरे यांची हत्या जागेच्या वादातून झाल्याची सांगण्यात येत आहे. बाळापुर पोलिसांनी या घटनेमधील दोषी असलेल्या दहा संशयित लोकांना ताब्यात घेतले असून, इतर आरोपींचा शोध पोलीस घेत आहे. नेमकी ही हत्या कोणत्या कारणामुळे करण्यात आली याचा शोध सुद्धा बाळापुर पोलीस घेत आहेत.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा