- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
akola-double-murder-crime: दुहेरी हत्याकांडाने अकोला शहर पुन्हा हादरले; लग्न घरात पसरली अवकळा, पत्नी व मुलीला यमसदनी धाडणारा आरोपी पोलिसांच्या ताब्यात
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
भारतीय अलंकार न्यूज 24
ॲड. नीलिमा शिंगणे जगड
अकोला: रामदास पेठ पोलीस स्टेशनच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या संतोषी माता मंदिर परिसरात म्हात्रे कुटुंबाची पहाट आज रक्तरंजित ठरली घरात लग्नाची धामधूम सुरू असताना घरात अचानक अवकळा पसरली आणि होत्याचं नव्हतं झालं.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनूसार, संतोषीमाता मंदिराला लागूनच असलेल्या घरात हा थरार बुधवारी सकाळी घडला. मनीष म्हात्रे (अंदाजे वय 39 वर्ष ) याने आपली पत्नी लक्ष्मी( वय अंदाजे 30 वर्ष) आणि मुलगी माही (वय अंदाजे 9 वर्ष) यांना रागाच्या भरात यम सदनी धाडले असल्याची घटना बुधवार 24 एप्रिल रोजी सकाळी घडली.
मनीष म्हात्रे याला दारूचे व्यसन जडले असल्याने घरात रोजचे वाद आणि किटकिट सुरू असायची. याच त्रासापायी पाच वर्षांपूर्वी लक्ष्मी ही आपल्या मुलीला घेवून नांदेड येथे माहेरी राहायला गेली होती. त्यानंतर तिने मुलीला शिक्षणासाठी मुंबई येथे नातेवाईकाकडे ठेवले होते.
दरम्यान उद्या 25 एप्रिल रोजी म्हात्रे यांच्याकडे लग्नकार्य असल्याने लक्ष्मी आणि माही यांना लग्नासाठी आमंत्रित केले होते. 23 एप्रिलच्या रात्री लग्न घरातील कामे आटपून घरातील सर्व जण गाढ झोपेत होते. मात्र, रात्री मनीष आणि लक्ष्मी यांच्यामध्ये जुना वाद उफाळून आला. शाब्दिक वाद वाढत गेला आणि याच रागामध्ये मनीषने घरात असलेली कुऱ्हाड उचलून मुलीवर वार करण्यास सुरू केले, आपली मुलगी रक्ताच्या थारोळ्यात पडलेली पाहून लक्ष्मी हंबरडा फोडणार असल्याचे पाहताच क्षणाचाही विलंब न करता मनीषने लक्ष्मीवर कुऱ्हाडीने वार घातले. यामध्ये दोघी मायलेकीचा जागीच मृत्यू झाला, असा घटनाक्रम समोर आला.
घटनेची माहिती मिळताच रामदास पेठ पोलीस ठाण्याचे पोलीस पथक लगेच घटनास्थळी पोहोचले. अकोला शहर उपविभागीय पोलीस अधिकारी सतीश कुलकर्णी देखील तातडीने घटनास्थळी पोहोचले. यावेळी आरोपीला घटनास्थळ वरून पोलिसांनी ताब्यात घेतले. पुढील तपास रामदास पेठ पोलीस करीत आहेत.
लग्न घरात अवकळा पसरल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा