akl-police-lok-sabha-election : लोकसभा निवडणूक प्रक्रिया शांतेतत पार पाडण्याकरीता अकोला पोलीस सज्ज





भारतीय अलंकार न्यूज 24

नीलिमा शिंगणे जगड 

अकोला: लोकसभा सार्वत्रिक निवडणुक 2024 अकोला मतदार संघाकरीता 26 एप्रिल रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. याकरिता अकोला जिल्हा पोलिस प्रशासन सज्ज झाले आहे. अकोला जिल्हयात 882 ठिकांणी 1719 मतदान केंद्रावर लोकसभा सार्वत्रिक निवडणुक 2024 प्रक्रीया पार पडणार आहे. त्याकरीता अकोला पोलीसांनी पूर्व तयारी केली असून निवडणुक प्रक्रीया शांततेत पार पडण्याचे दृष्टीने एकुण 4295 पोलीस अधिकारी, अंमलदार व होमगार्ड बंदोबस्ताच्या तयारीनिशी सज्ज झाले.  त्या व्यतिरिक्त बाहेर जिल्हयातील तसेच बाहेर राज्यातील पोलीस, आर.पी.एफ, सि.आय.एस.एफ केरला आर्म फोर्स, राज्य राखीव पोलीस दलाच्या तुकड्या बंदाबस्ता करीता सज्ज आहेत.



निवडणुक प्रक्रिया सुरू झाल्या पासुन जिल्हयामध्ये गुन्हेगारीवर जरब बसविण्या करीता विशेष मोहिमेचे आयोजन बच्चन सिंह, पोलीस अधीक्षक, अकोला यांचे मार्गदर्शनात करण्यात आले आहेत. त्यामध्ये अवैध दारू, अवैध रोख रक्कम, अमंली पदार्थ, शस्त्रे, अग्नीशस्त्रे किंवा इतर प्रलोभनात्मक वस्तु यांचा वापर किंवा वाहतुक होणार नाही याबाबीकडे विशेष लक्ष देवुन, सराईत, क्रियाशील गुन्हेगार, यापुर्वी निवडणुक आचार संहीता दरम्यान ज्या व्यक्तींवर गुन्हे नोंद आहेत अशा व्यक्तीवर प्रामुख्याने लक्ष केंद्रीत करून कार्यवाही करण्यात आली आहे.





अकोला जिल्हयात निवडणुकीच्या काळात जिल्हास्तरावर, उप-विभागीय स्तरावर तसेच पोलीस स्टेशन स्तरावर वेळोवेळी विशेष मोहीम तसेच राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय सिमांतर्गत सुरू असलेल्या 17 स्थिर सर्वेक्षण पथक (SST), तसेच 24 भरारी सर्वेदाण पथक (FST), व 02 शीघ्रकृती पथक (QRT) तैनात असुन निवडणुकीच्या काळात शस्त्र अधिनियमान्वये मध्ये 12 आरोपीकडुन 06 देशी कट्टे, 02 गावठी बंदुक व 17 जिवंत काडतुस तसेच इतर 63 आरोपीतांकडुन एकुण 65 घातक शस्त्रे (25 तलवारी, 19 सुरे, 04 कोयते, 02 खंजीर, 03 कत्ते, 12 चाकु) असे एकुण 67 केसेस व 75 आरोपीतांवर कारवाई करण्यात आली आहे.



दारूबंदी कायद्यान्वये एकुण 513 केसेस मधील 517 आरोपीतांकडुन एकुण 24,292.87 लिटर दारू जप्त करून एकुण 32,81,633/-रू मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे, अंमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यान्वये एकुण 02 केसेस मधील 08 आरोपीतांकडुन 160 किलो 670 ग्राम गांजा किंमत 3,21, 0940/-रू, अवैध गुटखा प्रकरणी 04 केसेस मध्ये 04आरोपींकडुन एकुण 2,11, 452/-रू चा मुद्देमाल असा एकुण विविध प्रकरणात 67,04,025 /- रू चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. त्याच प्रमाणे अकोला जिल्हयातील अभिलेखावर नोंद असलेल्या एकुण 06 फरार व 04 पाहीजे आरोपीतांना अभिलेखावरून अटक करण्यात आले आहे. तसेच पो.स्टे. मधील एकुण 785 गैरजमानती वारंट ची बजावणी करून 357 आरोपीतांना अटक करण्यात आली आहे.





निवडणुक प्रक्रीया शांततेत व भयमुक्त वातावरणात पार पाडण्याकरीता जिल्हयामध्ये एकुण 82 रूट मार्च चे आयोजन करण्यात आले होते तसेच जिल्हा सिमाअंतर्गत नाकाबंदी व कोम्बींग ऑपरेशन राबविण्यात आले आहे, अशी माहिती पोलीस प्रशासनाने दिली आहे.



यावर्षी निवडणुक आयोगाने ‘चुनाव का पर्व देश का गर्व’ या अनुषंगाने सोशल मिडीयाच्या माध्यमातुन मतदान विषयक जनजागृती करण्यात आली आहे. कोणत्याही प्रकारच्या अफवांना बळी न पडता नागरिकांनी शांततेत मतदान करावे. तसेच कोणताही अनुचित प्रकार दिसून आल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क करावा, असे आवाहन जिल्हा पोलिस अधीक्षक बच्चन सिंह यांनी केले असून निवडणुक प्रक्रीया पार पाडण्यासाठी अकोला पोलीस सर्तक असल्याचे सांगितले.

टिप्पण्या