akl-lok-sabha-election-2024: अकोल्यात 61.79 टक्के मतदान;Evm स्ट्रॉंग रूममध्ये सील बंद, 4 जूनला होणार मतमोजणी




भारतीय अलंकार न्यूज 24

नीलिमा शिंगणे जगड 

अकोला : अकोल्यात मतदानाचा टक्का वाढला आहे.  2019 च्या निवडणुकीत 60 टक्के झालेलं मतदान यंदा 61.79 वर आलं आहे. प्रशासनाच्या वतीने 65 ते 70 टक्के पर्यंत मतदान होईल, अशी आशा व्यक्त करण्यात आली होती. 



काल सकाळी 7 ते सायंकाळ 6 वाजेपर्यंत अकोला लोकसभेसाठी 6 विधानसभा क्षेत्रात मतदान प्रक्रिया पार पडली. आज सायंकाळी अंतिम मतदान टक्केवारी जाहीर करण्यात आली. यामध्ये सर्वाधिक मतदान बाळापूर येथे 66.58 टक्के झाल तर सर्वात कमी मतदान अकोला पश्चिम मतदार संघात 54.88 टक्के झाल. अकोला पूर्व मध्ये 59.36 , अकोट 64.02 , रिसोड 62.43, मुर्तिजापूर 64.52 टक्के मतदान झाल आहे.


यामध्ये एकूण 9,77,500

पुरुष मतदार , 9,13,269 महिला मतदार तर अन्य 45 असे 18,90,814 मतदरांपैकी 6,34,116 पुरुष , 5,34,239 आणि 11 अन्य असे एकूण 11,68,366 मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला आहे.



संथ गतीने सुरू झालेल्या मतदानाने 11 वाजता नंतर जोर पकडला होता. मतदान दरम्यान काही ठिकाणी EVM मशीनमध्ये तांत्रिक बिघाडमुळे मतदान थांबल होत. तर अनेक वर्षांपासून मतदान करत असलेल्या मतदारांचे नाव यादीत सापडले नाही. मात्र कुठही अनुचित प्रकार घडला नसून मतदान शांततेत पार पाडल आहे.



अकोल्यातील 15 उमेदवारांचे भाग्य आता EVM मशीन मध्ये बंद झाले आहे. तर मुख्य लढत महाविकास आघाडीचे उमेदवार काँगेस महविकास आघाडीचे डॉ.अभय पाटील, भाजप महायुतीचे उमेदवार अनुप धोत्रे आणि वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या मध्ये आहे.





अकोला लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काल शांतता पूर्वक मतदान प्रक्रिया पार पडली असून, जिल्ह्यात 61.79 टक्के  मतदान झाले आहे.

मतदानामध्ये वापरण्यात आलेल्या ईव्हीएम मशीनस् चोख पोलीस बंदोबस्तामध्ये निवडणूक आयोगाच्या मान्यतेने निश्चित केलेल्या एमआयडीसी मधील वखार महामंडळाच्या गोदामातील स्ट्रॉंग रूममध्ये सील बंद करून ठेवण्यात आले आहे.

सदरची ईव्हीएम मशीन हे थ्री लेअर सिक्युरिटी मध्ये ठेवण्यात आले असून याकरिता सी.एफ. सिक्युरिटी, स्टेट पोलीस सेक्युरिटी तसेच जिल्हा पोलीस सिक्युरिटी अशा प्रकारच्या चोख बंदोबस्तामध्ये या ठिकाणी ठेवण्यात आले आहे. या सोबतच  ईव्हीएम मशीनच्या सुरक्षे करिता 24 तास cctv कॅमेरांची नजर सुद्धा राहणार आहे. 4 जून रोजी होत असलेल्या मतमोजणी पर्यंत सदरच्या ईव्हीएम या सीलबंद अवस्थेत गोदामात सुरक्षित राहणार आहे. तर 4 जून  ला याच ठिकाणी मतमोजणी केली जाणार आहे.

टिप्पण्या