unseasonal-rain-in-akola-city: अकोल्यात सायंकाळी वादळी वाऱ्यासह पाऊसधारा; विदर्भात उद्याही पावसाची शक्यता





भारतीय अलंकार न्यूज 24

नीलिमा शिंगणे जगड 

अकोला : अकोल्यात शुक्रवारी सायंकाळी अचानक वादळ वाऱ्यासह पाऊसधारा बरसल्याने नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. तेल्हारा तालुक्यातील हिवरखेड येथे जोरदार पावसाने हजेरी लावली तर अकोला शहरात सुध्दा पाऊस पडला.



अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यातील हिवरखेड येथे आज शुक्रवारी अवकाळी पावसाने हजेरी लावली. गेल्या काही दिवसांपासून तेल्हारा तालुक्यात ढगाळ वातावरण आहे. तर काही दिवसांपूर्वी गारपीटीसह जोरदार पाऊस ही बरसला होता. अचानक आलेल्या या पावसामुळे हरभरा, गहू आणि फळपिकांना फटका बसण्याची शक्यता आहे.






आज सांयकाळी अकोला शहरात सुध्दा जोरदार वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. अचानक आलेल्या या पावसामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. सायंकाळीं रस्त्याने वर्दळ असल्याने वाहन धारकांची चांगलीच कोंडी झाली. बाजारपेठेत खरेदीला आलेल्या लोकांची फजिती झाली. फूटपाथ फेरीवाले विक्रेत्यांची तारांबळ उडाली होती.



विदर्भात पावसाची शक्यता 

प्रादेशिक हवामान केंद्र नागपूरने दिलेल्या अंदाजानुसार अकोला आणि गोंदिया जिल्ह्यामध्ये 2 मार्च रोजी विजांच्या कडकडाटासह वादळ, सोसाट्याचा वारासह पाऊस होण्याची शक्यता आहे. तर अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह वादळ, सोसाट्याचा वारा आणि गारपीट होण्याची शक्यता वर्तवली आहे. तर बुलढाणा, वाशिम, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली मध्ये वातावरण चांगले राहणार आहे.



टिप्पण्या