robotic-joint-replace-surgery: जीपीए सदस्यांसाठी " रोबोटिक् जॉइंट रिप्लेसमेंट सर्जरी " विषयावर डॉ.समीर देशमुख यांची सिएमई संपन्न





भारतीय अलंकार न्यूज 24

ॲड. नीलिमा शिंगणे जगड 

अकोला: स्थानिक हॉटेल सेन्टर प्लाझा येथे नुकतीच जनरल प्रॅक्टिशनर्स असोसिएशन अकोला द्वारा सदस्यांसाठी सुप्रसिद्ध आर्थोपेडिक सर्जन डॉ . समीर देशमुख यांचे " रोबोटिक् जॉइंट रिप्लेसमेंट सर्जरी " या अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित सीएमई घेण्यात आली . माणसाच्या गुढघ्यावर गुढघा बदलण्याची शस्त्रक्रिया रोबोटच्या साहाय्याने कमी वेळात कशी केल्या जाते याचे प्रात्यक्षिक द्वारे डॉ. समीर देशमुख यांनी मार्गदर्शन केले. 






रोबोटच्या मदतीने अश्याप्रकारे शस्त्रक्रिया करणारे डॉ. समीर देशमुख हे अकोल्यातील एकमेव आणि विदर्भातील तिसरे सर्जन आहेत.  रोबोटच्या मदतीने होणाऱ्या ह्या सर्जरीत वेळ कमी लागतो आणि रुग्ण हा लवकर चालायला लागतो, असे यावेळी डॉ . समीर देशमुख यांनी सांगितले.


सीएमई जीपीएचे अध्यक्ष डॉ. सतीश उटांगळे यांचे अध्यक्षतेखाली पार पडली . प्रमुख अतिथी स्त्रीरोग तज्ञ  डॉ. सुषमा देशमुख उपस्थित होत्या . प्रस्ताविक डॉ. प्रद्युम्न शाह यांनी केले तर संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्र संचालन जीपीएचे सचिव डॉ. विनय दांदळे यांनी केले तर उपस्थितांचे आभार जीपीएचे कोषाध्यक्ष डॉ. आदित्य नानोटी यांनी मानले . 



सीएमई कार्यक्रमाला जीपीएचे पदाधिकारी आणि सदस्य डॉ. राजेंद्र अग्रवाल, डॉ . युवराज देशमुख, डॉ. रवी आलीमचंदानी , डॉ. सुनील बिहाडे ,डॉ. प्रवीण अग्रवाल , डॉ. नरेंद्र गोंड , डॉ. माळोकर , डॉ. योगेश साहू , डॉ. दीपाली भांगडीया , डॉ.प्रियंका देशमुख , डॉ. वर्षा राव , डॉ. प्रशांत सांगळे , डॉ.समीर भुजबळ , डॉ. इंगळे , डॉ. चौरसिया , डॉ. सुनील लुल्ला , डॉ. जाधव , डॉ. नरेंद्र श्रीवास , डॉ. केशव महाशब्दे, डॉ. राजेश काटे, डॉ . खेडकर यांचेसह जीपीएचे सदस्य बहुसंख्येने उपस्थित होते. 




टिप्पण्या