residence-akola-city-police : अकोल्यात उभी राहणार टोलेजंग इमारत; पोलीस कर्मचाऱ्यांच्या निवासाचा प्रश्न निकाली, आमदार सावरकर यांच्या मागणीची पूर्तता



भारतीय अलंकार न्यूज 24

ॲड. नीलिमा शिंगणे जगड 

अकोला: समाजाची रक्षा करणारे दिवस रात्र कायदा सुव्यवस्था सांभाळणारे पोलीस कर्मचारी यांच्या निवासस्थान करिता राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस यांनी दक्षता नगर येथे 300 निवास मंजुर करुन उभी केली केली. आता पुन्हा आमदार रणधीर सावरकर यांच्या मागणीची दखल घेऊन दक्षता नगर येथे पोलीस कर्मचाऱ्यांच्या निवाऱ्याचा प्रश्न कायम निकाली काढण्यात आला.  राज्याचे उपमुख्यमंत्री व गृहमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस यांनी सर्व सुविधा युक्त अत्याधुनिक निवासस्थान मंजूर केले आहेत. मुंबईच्या धरतीवर 12 मजली या इमारतीमध्ये 246 सदनिका राहणार आहेत. यामुळे अकोला शहराच्या सौंदर्यात भर पडणार आहे. त्याचसोबत पोलीस कर्मचाऱ्यांच्या निवासाचा प्रश्न कायम निकाली लागणार आहे. 


राज्याचे उपमुख्यमंत्री व गृहमंत्री तसेच अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री असताना नामदार देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस कर्मचाऱ्यांच्या भावना लक्षात घेऊन तसेच वाढती लोकसंख्या व कायदा सुव्यवस्था पोलीस भरती लक्षात घेऊन दहा वर्षाचा आराखडा तयार करून अत्याधुनिक सर्व सुविधायुक्त पोलीस कर्मचाऱ्यांच्या परिवाराला चांगलं जीवन जगता यावा व त्या परिसरात सर्व सुविधा मुंबई हैदराबादच्या धरतीवर पोलीस कॉलनी निर्माण करण्याचा इतिहासिक निर्णय घेतला होता. 121 कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करून देऊन विकास पर्वाला गती दिली.



तसेच 368 कोटी रुपयाचे रस्त्यांचे कामाला तसेच पाच कोटी रुपये तीर्थस्थळासाठी मंजूर केले व विविध पस्तीस योजनांना मंजुरी देऊन राज्याचे मुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे नामदार देवेंद्र फडणवीस व नामदार अजित पवार यांनी अकोलेकरांना अनुपम भेट दिली आहे.



पोलीस कर्मचाऱ्यांची भरती सोबत पोलीस कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानाची व्यवस्था चांगल्या पद्धतीने व्हावी त्यांचं निवासस्थानं सर्व सुविधायुक्त त्या परिसरात सर्व सुविधा असावी या दृष्टीने एक आराखडा तयार केला असून यासाठी आज बांधकामा संदर्भात निविदा सुद्धा प्रकाशित करून ताबडतोब दोन महिन्यात आचारसंहिता संपल्यानंतर कामाला सुरुवात होणार आहे. 



आमदार रणधीर सावरकर सातत्याने सर्वसामान्य नागरिक शेतकरी पोलीस कर्मचारी तसेच समाजातील व्यापारी व विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या प्रश्न सोडवण्यासाठी खासदार संजय धोत्रे यांच्या मार्गदर्शनात व विविध सहकाऱ्यांच्या माध्यमातून तसेच आपले लोकप्रतिनिधी सहकारी यांच्या माध्यमातून न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करत आहे. 





आज अकोल्याच्या इतिहासामध्ये पोलीस कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानाच्या प्रश्नासाठी दुसरी भव्य दिव्य व अकोल्याच्या इतिहासात सर्वात मोठी बारा मजली इमारत उभारण्याचा निर्णय गृहमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस यांनी घेऊन आमदार रणधीर सावरकर यांच्या मागणीची दखल घेऊन न्याय दिल्याबद्दल आमदार रणधीर सावरकर यांनी राज्य शासनाचे व विशेषता तत्कालीन पालकमंत्री व पालकत्व स्वीकारले. राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस यांना कोटी कोटी धन्यवाद देऊन त्यांचे आभार व्यक्त केले आहे.

टिप्पण्या