political news: शासनाची भूमिका शेतकऱ्यांच्या विरोधात - ॲड. प्रकाश आंबेडकर




भारतीय अलंकार न्यूज 24

अकोला: केंद्र आणि राज्य शासनाची भूमिका ही शेतकऱ्यांच्या विरोधात असून, या सरकारला जनता धडा शिकवेल असा इशारा वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी दिला. 



पारस येथील कुणबी समाज मेळाव्यात  प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते.





ते पुढे म्हणाले की, दिल्लीत शेतकरी आंदोलन करीत आहेत. हमीभावाचा कायदा झाला पाहिजे, जमिनी संदर्भात कॉन्ट्रॅक्ट सिस्टीम बंद झाली पाहिजे, यांच्यासह अनेक मागण्या या शेतकऱ्यांच्या आहेत, मात्र शासनाकडून अद्याप कोणताही सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्यामुळे लाखो शेतकऱ्यांच्या मनात असंतोष खदखदत आहे. या शासनाला शेतकऱ्यांची कोणतीही दयामाया नाही, शेतकऱ्यांची पिळवणूक कशी करता येईल यावर राज्यकर्त्यांचा भर आहे.  देशभर शासन विरोधात लाट असून आगामी लोकसभेच्या निवडणूक मध्ये भारतीय जनता पक्ष 150 जागा सुद्धा जिंकणार नाही असा दावा ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी केला.






महाराष्ट्र हिंदू-मुस्लिम दंगलीच्या उंबरठ्यावर असून कुणबी-ओबीसी मध्ये सुद्धा वाद लावले जात असल्याचा आरोप यावेळी प्रकाश आंबेडकरांनी केला.



वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर हरी भक्तीत लिन झाल्याचे दिसून आले. या संवाद मेळाव्यात प्रकाश आंबेडकर यांनी कार्यक्रम स्थळी टाळ वाजवून प्रवेश केला. या कार्यक्रमात आंबेडकर स्वतःला थांबवू शकले नाही आणि  कीर्तनाच्या निमित्त वारकाऱ्यांसोबत टाळ हाती घेवून वाजवली.





NDA ला 400 पेक्षा अधिक जागा मिळणार असल्याचा दावा केला जात आहेय, मात्र यांदा NDA ला 150 जागा सुद्धा मिळवता येणार नसल्याचं वक्तव्य वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे. अकोल्यातील पारस येथे कुणबी संवाद मेळाव्याच्या आयोजना नंतर ते माध्यमांशी बोलत होते. या मेळाव्यात प्रकाश आंबेडकर यांनी कुणबी समाजाला मार्गदर्शन केलं. महाविकास आघाडीत सोबत सुरू असलेल्या चर्चे संबंधात बोलतांना त्यांनी आपला प्रस्ताव त्यांना दिला असल्याचं म्हणत निर्णय महाविकास आघाडीने घ्या असंही  प्रकाश आंबेडकर म्हणाले.







मेळाव्यात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शांताराम पाटेखेडे, जगन्नाथ तिडके, श्रीकृष्ण वडोदे यांनी आपल्या समर्थकांसह बाळासाहेब आंबेडकर यांच्या उपस्थितीत वंचित बहुजन आघाडी मध्ये प्रवेश केला.

टिप्पण्या