- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
political-news-bjp-party-akola: मोदी सरकारने जनतेच्या हिताचे निर्णय घेतल्याने गावागावात विकासगंगा अवतरली- अनुप धोत्रे
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
भारतीय अलंकार न्यूज 24
बाळापुर: मोदी सरकारने अनेक लोककल्याणकारी योजना अंमलात आणून जनतेच्या हिताचे निर्णय घेतल्याने गावागावात विकासाची गंगा अवतरली असल्याचे मत लोकसभा निवडणूक प्रमुख अनुप धोत्रे यांनी व्यक्त केले.
ते बाळापुर विधानसभा मतदारसंघातील कंचनपुर, लोणाग्रा, खांबोरा, मंडाळा, दुधाळा, निराट,गोपालखेड येथील विविध विकासकामाचे भुमिपुजन व लोकार्पण प्रसंगी दुधाळा येथे आयोजित कार्यक्रम प्रसंगी बोलत होते.
पुढे ते म्हणाले की, महिला,शेतकरी, कारागीर, युवाशक्ती साठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने अनेक महत्वाकांक्षी निर्णय घेऊन त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी केली असून गरिबी हटविण्याच्या बाता न करता गरिबी हटावी म्हणून गरजवंत लोकांना हक्काची घर तर दिलीच पण या घरावर महिला कुटुंब प्रमुखाचा हक्क असावा म्हणून घराच्या मालकी पत्रावर महिलेचे नाव असावे म्हणून तसा नियम करून महिलेचा देखील सन्मान केला आहे घराघरात उज्वला योजनेच्या माध्यमातून गॅस कनेक्शन पोहचविण्याचे काम केले मुस्लिम महिलांचा होणारा छळ थांबण्यासाठी तिन तलाक असे महत्त्वाचे निर्णय घेतले असल्याने महिलांना सन्मान देण्याचे काम केले
यावेळी मा आ बळीराम सिरस्कार, तालुका अध्यक्ष देवेंद्र देवर, किसान आघाडी जिल्हाध्यक्ष श्रीकृष्ण मोरखडे, सरचिटणीस विजय फुकट आदीसह बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा