file image
भारतीय अलंकार न्यूज 24
नीलिमा शिंगणे जगड
अकोला: १२ मार्च मंगळवार पासून खंडबा सनावद दरम्यान मेमू गाडी सुरू करण्यात आली आहे. सात वर्षाच्या काळानंतर हे गेज परिवर्तन कार्य इतक्या भागात पूर्ण झाले आहे परळी वैजनाथ बारा ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग येथे आहे येथून अकोल्यापर्यंत प्रवासी गाडी धावते या गाडीचा नंबर ०७७७४/०७६०० असं आहे. या मार्गावरच हिंगोली येथे औंढा नागनाथ आहे या गाडीचा विस्तार सणावद पर्यंत करण्यात यावा, अशी मागणी विदर्भ यात्री संघाने केले आहे.
यामुळे शिवभक्तांना ओंकारेश्वर जाण्यास सुविधा होईल तसेच रावेर नेपानगर बुऱ्हानपूर खंडवा येथे ये जा करणाऱ्या प्रवाशांना सोयीस्कर होईल. सनावद येथून इंदोरला जाण्याकरता सुद्धा सोपे होईल.
परळी वैजनाथ अकोला मार्गे मलकापूर या गाडीचा विस्तार सनावदपर्यंत करण्यात यावा किंवा सणावद खंडवा गाडीचा अकोल्यापर्यंत करण्यात यावा या आशयाचे निवेदन मध्य रेल्वेचे महाप्रबंधक रामकरण यादव व दक्षिण मध्य रेल्वेचे अरुण कुमार जैन मंडळ रेल प्रबंधक भुसावळ ईती पांडे व मंडळ रेल प्रबंधक नांदेड नीती सरकार यांना पाठविले, अशी माहिती संघाचे अध्यक्ष डॉ रवि आलिमचंदानी, अशोक अग्रवाल, दीप मनवानी, राजू अकोटकर यांनी दिली आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा