भारतीय अलंकार न्यूज 24
नीलिमा शिंगणे जगड
अकोला : लोकसभेचे वारे वाहू लागले आहे.अशातच प्रत्येक पक्ष आता निवडणुकीच्या कामाला लागला आहे.यामध्ये मग फोडाफाडीच राजकारण असो, पक्ष बांधणी असो की उमेदवारांची चाचपणी.अकोल्यात सुद्धा सर्व पक्ष लोकसभेच्या तयारीत लागले आहे, यामध्ये वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकरांनी अकोल्यातून निवडणूक लढणार असल्याचं आधीच जाहीर केलं आहे.
आंबेडकरांची युती महाविकास सोबत झाली असल्याचं चित्र आहे. मात्र जागा वाटपाचा तिढा अध्यापही बाकी आहे. असं असतांना भाजपने आपली तयारी सुरू केली आहे.
काल गुरूवार 29 फेब्रुवारी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी चर्चा आणि मनोगत ऐकण्यासाठी पक्ष निरीक्षक म्हणून नेमण्यात आलेले वर्धाचे खासदार रामदास तडस आणि निलंगाचे आमदार संभाजी पाटील हे अकोला दौऱ्यावर होते. अकोला लोकसभेची माहिती यावेळी त्यांनी घेतली.
विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहिती नुसार, यावेळी भाजपचे नेते विजय मालोकार यांनी अकोला लोकसभा लढण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
यासंबंधी मालोकार यांनी आपल्या राजकीय प्रवास संबंधित माहिती पत्र सुद्धा निरीक्षकांना दिलं आहे. भाजप मध्ये इच्छुकांची संख्या मोठी असून, पक्ष शेवटी उमेदवारी कुणाला जाहीर करेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा