lok-sabha-election-akola-2024: मोदी, शहा, मुंडे, फडणवीस, भुजबळ, पवार, शिंदे अकोल्यात प्रचाराला येणार; महायुतीची विशाल जाहीर सभेची जय्यत तयारी सुरू…





भारतीय अलंकार न्यूज 24

नीलिमा शिंगणे जगड 

अकोला: अकोला लोकसभा मतदार संघात भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस यांनी प्रचारात आघाडी घेतली असून, महिला आघाडी महायुतीचे घटक पक्ष यांनी ‘घर चलो बुथ रिकामा’ अंतर्गत जिल्ह्यातील 2050 बुथ सेंटरवर जनसंपर्क करण्याचा संकल्प केला असून, या दृष्टीने घटक पक्षातील सर्व पदाधिकारी सह कामाला लागले आहे. तीन एप्रिल रोजी महायुतीचे उमेदवार अनुप धोत्रे नामांकन अर्ज दाखल करणार आहेत. यावेळी परंपरागत वेशभूषेत मोठ्या संख्येने महायुतीचे कार्यकर्ते उपस्थित राहणार आहे. 




युतीचे उमेदवार अनुप धोत्रे यांच्या प्रचारार्थ आंतरराष्ट्रीय नेते व देशाचे  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची विशाल सभा होण्याच्या दृष्टीने नियोजन सुरू असून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित  पवार, छगन भुजबळ, पंकजा मुंडे, धनंजय मुंडे,  लोकनेते नितीन गडकरी, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव हे सुद्धा प्रचारात येण्याची शक्यता असून यासंदर्भात प्रदेश महायुती कार्यालयातून लवकरच माहिती देण्यात येणार आहे, असे भाजपा सूत्रांनी सांगितले.


जिल्ह्यातील तेल्हारा, अकोट, वाडेगाव, बोरगाव मंजू, मालेगाव, रिसोड, चोहट्टा बाजार सभा चाचणी जिल्हा महायुती तसेच प्रदेश कार्यालयातून होत असल्याची माहिती भाजप सूत्रांनी दिली.



पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची 15 एप्रिल ते 20 एप्रिलच्या दरम्यान विशाल जाहीर सभा होण्याच्या दृष्टीने जय्यत तयारी सुरू असून, देशाचे गृहमंत्री अमित शहा हे सुद्धा या सभेला उपस्थित राहण्याची शक्यता असल्याचे सूत्रांनी सांगितले.


टिप्पण्या