lok-sabha-election-akola-2024: प्रकाश आंबेडकर यांचा नामांकन अर्ज दाखल; पदाधिकाऱ्यांच्या हस्ते अर्ज सुपूर्द, आज एकूण 89 अर्जांची उचल




भारतीय अलंकार न्यूज 24

नीलिमा शिंगणे जगड 

अकोला: लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 06- अकोला लोकसभा मतदार संघासाठी आज 30 मार्च रोजी दोन नामनिर्देशन पत्रे दाखल झाली आहेत. यामध्ये प्रकाश यशवंत आंबेडकर (वंचित बहुजन आघाडी) यांचा तर दुसरा अर्ज मुरलीधर लालसिंग पवार (अपक्ष) यांनी भरला आहे.




वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी आज नामांकन अर्ज दाखल करण्याच्या तिसऱ्या दिवशी आपल नामांकन अर्ज भरला आहे. प्रकाश आंबेडकर हे स्वतः नामांकन अर्ज भरण्यासाठी उपस्थित नव्हते तर पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी प्रकाश आंबेडकरांच्या वतीने हा नामांकन अर्ज भरला.


आंबेडकर स्वतः भरणार अर्ज

हा नामांकन अर्ज चाचपणी म्हणून भरण्यात आल्याचं सूत्रांनी म्हंटल. तर 2 एप्रिलला प्रकाश आंबेडकर स्वतः उपस्थित राहून नामांकन अर्ज भरणार असल्याचं पक्षाच्या वतीने सांगण्यात आलं. आज एकूण दोन उमेदवारांचे अर्ज भरण्यात आले.  यामध्ये एक अपक्ष उमेदवाराचा ही समावेश आहे.




लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 06- अकोला लोकसभा मतदार संघासाठी आज दोन नामनिर्देशन पत्रे दाखल  झाली. प्रकाश यशवंत आंबेडकर (वंचित बहुजन आघाडी) आणि मुरलीधर लालसिंग पवार (अपक्ष) यांचा यात समावेश आहे.


अभय पाटील यांनी घेतला अर्ज 


दरम्यान, आज 51 व्यक्तींनी 89 अर्जांची उचल केली. काँग्रेस पक्षाचे संभाव्य उमेदवार डॉ. अभय पाटील यांनी देखील आज अर्ज घेतला आहे.


31 मार्च सुटी 

नामनिर्देशनपत्र दाखल करण्याचा कालावधी ४ एप्रिलपर्यंत असून, दि. 31 मार्च या सुटीच्या दिवशी नामनिर्देशनपत्रे स्वीकारली जाणार नाहीत. 


लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024


अमरावती विभागात आज सहा नामनिर्देशनपत्र दाखल


विभागात आतापर्यंत 472 नामनिर्देशनपत्रांची विक्री

 


       

अमरावती:  लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या दुसऱ्या टप्प्यासाठी आज अमरावती विभागातील चार लोकसभा मतदारसंघापैकी अमरावती लोकसभा मतदारसंघामध्ये चार व अकोला मतदारसंघामध्ये दोन असे एकूण सहा नामनिर्देशनपत्र दाखल  झाले आहे. तसेच या चारही मतदारसंघामध्ये गेल्या दोन दिवसात 472 नामनिर्देशनपत्रांची विक्री झाली आहे.


       

अमरावती लोकसभा मतदारसंघातून आज बळवंत बसवंत वानखडे यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्यावतीने चार नामनिर्देशनपत्र दाखल केले. अकोला लोकसभा मतदारसंघातून प्रकाश यशवंत आंबेडकर यांनी वंचित बहुजन आघाडी पक्षाच्यावतीने एक व मुरलीधर लालसिंग पवार यांनी अपक्ष म्हणून एक नामनिर्देशन पत्र दाखल केले.


      

विभागातील यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदार संघामध्ये नामनिर्देशनपत्र दाखल करण्याच्या दुसऱ्या दिवशी एकही नामनिर्देशनपत्र दाखल झाले नाही.


      

अमरावती लोकसभा मतदारसंघात 28 मार्च रोजी 75 तर 30 मार्च रोजी 95 असे आतापर्यंत एकूण 170 नामनिर्देशनपत्र खरेदी करण्यात आले. अकोला लोकसभा मतदारसंघात 28 मार्च रोजी 38 तर 30 मार्च रोजी 89 असे आतापर्यंत एकूण 127 नामनिर्देशन पत्र खरेदी करण्यात आले. यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघात 28 मार्च रोजी 44 तर 30 मार्च रोजी 40 असे आतापर्यंत एकूण 84 नामनिर्देशन पत्र खरेदी करण्यात आले. बुलडाणा लोकसभा मतदारसंघात 28 मार्च रोजी 67 तर 30 मार्च रोजी 24 असे आतापर्यंत एकूण 91 नामनिर्देशन पत्र खरेदी करण्यात आले.


        

विभागातील चारही लोकसभा मतदार संघासाठी गुरुवार, 28 मार्च रोजी अधिसूचना जारी झाली आहे. 4 एप्रिल ही उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे. तर 5 एप्रिल रोजी उमेदवारी अर्जांची छानणी करण्यात येणार आहे. 8 एप्रिल ही उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख आहे. 26 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. तर 4 जून रोजी मतमोजणी होवून निकाल जाहीर होणार आहे. आदर्श आचारसंहिता 6 जूनपर्यंत लागू राहणार आहे.


            






टिप्पण्या