lok-sabha-election-2024-akola: वंचित शेवटच्या क्षणापर्यंत आघाडी मध्ये सामील होण्याची वाट पाहणार- प्रकाश आंबेडकर



भारतीय अलंकार न्यूज 24

नीलिमा शिंगणे जगड 

अकोला : भाजप सोबत झोपून आलेल्यांनी आम्हाला आणि महाविकास आघाडीला शहाणपण शिकवू नये, असा खोचक टोला वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी संजय राऊतांना लगावला.




संजय राऊत यांनी, सांगली मध्ये भाजपला कुणी मदत करत असेल तर आम्ही रोखू शकणार नाही, असं म्हंटल होते. त्यावर आंबेडकरांनी ही प्रतिक्रिया दिली. ते मंगळवारी अकोल्यात पत्रकार परिषदेत बोलत होते.


महाविकास आघाडी मध्ये अजूनही जागा वाटपाचा तिढा कायम असल्याचंही ते म्हणाले. काही तासांपूर्वी वंचितच्या वतीने काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना पत्र पाठवण्यात आलं आहे. काँग्रेसच्या वाटेवर आलेल्या 7 जागेवर आम्ही मदत करायला तयार आहोत अस या पत्रात नमूद करण्यात आलं. तर शरद पवार राष्ट्रवादी आणि शिवसेना ठाकरे बद्दल आम्ही अजून निर्णय नाही घेतला नसल्याचही आंबेडकर म्हणाले वंचित शेवटच्या क्षणापर्यंत आघाडी मध्ये सामील होण्याची वाट पाहणार असल्याचं शेवटी आंबेडकर म्हणाले.




यावेळी वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ धैर्यवर्धन पुंडकर, पश्चिम विदर्भ महासचिव बालमुकुंद भिरड जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे, जिल्हा महासचिव मिलींद इंगळे, ओबीसी नेते गोपाल राऊत, मिडिया प्रमुख ॲड.नरेंद्र बेलसरे, जिल्हा प्रसिध्दी प्रमुख विकास सदांशिव, महानगर महासचिव गजानन गवई, पराग गवई आदी पदाधिकारी उपस्थित होते.

टिप्पण्या