लोकसभा सार्वत्रिक निवडणुक 2024
Lok Sabha General Election 2024
भारतीय अलंकार न्यूज 24
नीलिमा शिंगणे जगड
अकोला : एकीकडे महाविकास आघाडी आणि वंचित बहुजन आघाडीचा जागा वाटपाचा तिढा सुटला नसल्याने उमेदवाराची अधिकृत घोषणा करण्यात आली नाही. मात्र अकोला लोकसभा मतदार संघासाठी भारतीय जनता पक्ष तर्फे विद्यमान खासदार संजय धोत्रे यांचे सुपुत्र अनुप धोत्रे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. अनुप धोत्रे यांची ही पहिलीच निवडणूक आहे.
उमेदवारीची अधिकृत घोषणा झाल्याने भाजप उमेदवार अनुप धोत्रे यांनी जनसंपर्काला सुरुवात केली आहे. अनुप धोत्रे यांनी अकोला शहराचे आराध्य दैवत श्री राजराजेश्वर मंदिरात महादेवाला जलाभिषेक आणि आरती करुन प्रचाराचा नारळ आज मंगळवारी सकाळी फोडला. यावेळी त्यांच्या आई सुहासिनी धोत्रे, पत्नी यांनी देखील पूजा अर्चना केली. आमदार रणधीर सावरकर, ज्येष्ठ नेते विजय अग्रवाल यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
श्री रेणुका माता मंदिरात जावून अनुप धोत्रे यांनी देवीचे दर्शन घेतले. यानंतर मतदारांना भेटून संवाद साधला.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा