lok-sabha-election-2024-akola: वंचित बहुजन आघाडी अजून ही ‘वेट अँड वॉच’ च्या भूमिकेत




भारतीय अलंकार न्यूज़ 24

अकोला: वंचित बहुजन आघाडी अजून ही ‘वेट अँड वॉच’ च्या भूमिकेत असल्याचं दिसून येत आहे. काल मुंबई येथे पार पडलेल्या राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेसाठी वंचितचे सर्वेसर्वा ॲड. प्रकाश आंबेडकर यांना आमंत्रित करण्यात आलं होतं. याठिकाणी वंचितच महाविकास आघाडीमध्ये सामील होणं आणि जागा वाटपाचा तिढा सुटणं अपेक्षित होत मात्र या ठिकाणी कोणतीही चर्चा झाली नसल्याचं आंबेडकर म्हणाले. 





त्या ठिकाणी आमंत्रित होतो तर फक्त तेजस्वी यादव आणि फारूक अब्दुल्ला यांच्या सोबतच बोलणी झाली असल्याचं आंबेडकर म्हणाले. 



तर आपली भूमिका स्पष्ट करण्यासाठी आणखी वेळ असून इंडिया मध्ये सामिल होण्याविषयी आपल्याला काही ही माहिती नसून कोर कमिटी सर्व निर्णय घेतील म्हणत आंबेडकरांनी पुन्हा ‘वेट अँड वॉच’ चे संकेत दिले.


ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी आज अशोक वाटिका येथे आयोजित मातंग समाज संवाद मेळावा प्रसंगी प्रसार माध्यमांसमोर प्रतिक्रिया दिली. लोकसभा सार्वत्रिक निवडणुक 2024 च्या पार्श्वभूमीवर ॲड. प्रकाश आंबेडकर यांचे अकोला मतदार संघात सभा, मेळावे सुरू आहेत. 


टिप्पण्या