lok-sabha-election-2024-akola अमरावतीची जागा भाजपचीच या जागे विषयी वरिष्ठ निर्णय घेतील- देवेंद्र फडणवीस





भारतीय अलंकार न्यूज 24

नीलिमा शिंगणे जगड 

अकोला: संजय राऊत कोण आहे आणि संजय राऊत सारख्या माणसाबद्दल मला विचारून माझ्या प्रतिमेबद्दल विचार करा, अशी खोचक टीका भाजपा नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संजय राऊतांवर केली. ते अकोल्यात आयोजित भाजप आढावा बैठक व भाजप उमेदवार अनुप धोत्रे यांच्या प्रचारार्थ आले असता माध्यमांशी बोलत होते.





हर्षवर्धन पाटील यांची नाराजी नव्हती तर त्यांचे काही प्रश्न होते, त्यांच्या सारखे नेतृत्व मोठे झाले पाहिजे ही भाजपचा प्रयत्न असून, मोहिते पाटील यांच्याशी सुद्धा चर्चा करणार असल्याच फडणवीस म्हणाले. अमरावतीची जागा भाजपची आहे तर भाजपच्या चिन्हावर येथील उमेदवार ही निवडणूक लढणार असून नवनीत राणा यांनी सातत्याने नरेंद्र मोदींना समर्थन केलं आहे. त्यामुळे अमरावतीच्या या जागे विषयी निर्णय वरिष्ठ घेतील असल्याचं फडणवीस म्हणाले. तर वंचितच महाविकास आघाडीत समावेश होणार की नाही या बद्दल तेच सांगू  शकतील असंही फडणवीस म्हणाले.




मेरा बूथ मजबूत बुथ

भाजपा कार्यकर्त्यांनी बुथ लढाई जिंकण्याच्या दृष्टीने व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मेरा बूथ मजबूत बुथ’ या अभियानासाठी व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात सारे विरोधी पक्ष एकत्र येऊन वेगवेगळे रूप धारण करून वेगवेगळ्या अफवांचा बाजार करून पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा विराजमान होऊ नये, यासाठी प्रत्येक मतदारसंघात वेगवेगळ्या घडून भाजपा उमेदवार विजय होऊ नये, यासाठी प्रयत्न करणार आहे. यापासून सावध राहून भारतीय जनता पक्ष महायुतीचे प्रत्येक उमेदवार हा मोदींचा उमेदवार आहे. मोदींसाठी आपल्याला काम करायचा आहे. मोदींना विजयी करायचा आज संकल्प घेऊन कार्याला लागा, असे आवाहन भाजपा नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.



अकोला लोकसभा मतदारसंघातील भाजपा कार्यकर्त्यांच्या संचलन समिती व पदाधिकाऱ्यांच्या संकल्प विजय कार्यक्रमात सिटी स्पोर्ट येथे बुधवारी आयोजित बैठकीत ते बोलत होते. 



बैठकीच्या अध्यक्षस्थानी प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे होते.  मंचावर भाजपा प्रदेश सरचिटणीस आमदार रणधीर सावरकर, लोकसभा उमेदवार अनुप धोत्रे विराजमान होते. 





अकोला लोकसभा मतदारसंघात कार्यकर्त्यांनी सजग राहून मोठा उद्देश लक्षात घेऊन देशाला सुजलाम सुफलाम सोबत महाशक्तिशाली राष्ट्र निर्माण करिता फिरसे मोदी सरकार स्थापना करिता मोदी यांनी दिलेल्या उमेदवाराला विजयी करणे एकमेव लक्ष घेऊन कार्याला लागा. 51 टक्के पेक्षा जास्त मताधिक्य अकोला लोकसभा मतदारसंघात मिळवा. यासाठी सर्वांना सोबत घेऊन कामाला लागा व आदेश किंवा मान-अपमानापेक्षा देश महत्त्वाचा असून पक्ष महत्त्वाचा असून महायुतीच्या उमेदवाराला विजयी करण्यासाठी आपल्या परिसरात आतापासून कामाला लागा. आपापल्या बूथवर मताधिक्य मिळवण्याचा एकमेव लक्ष ठेवून कामाला लागा. कारण विरोधक हतबल झाले आहे. त्यांच्याकडे मुद्दे नाही त्यामुळे वेगवेगळ्या प्रकार करण्याचा प्रयत्न ते करतील. त्यापासून सावध राहा. विरोधक एकजुटीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान होऊ नये यासाठी एक एक जागा कमी करण्याचा प्रयत्न प्रत्येक मतदारसंघात वेगवेगळे प्रयत्न साथ धर्म वेगवेगळे मुद्दे उपस्थित करून भाजपा व मोदी समर्थकांमध्ये सोबत तसेच राष्ट्र भक्तांमध्ये मतभेद निर्माण करण्याचा प्रयत्न होत असेल, त्यापासून सुद्धा सावध राहून भाजप कार्यकर्ता कामाला लागा व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अकोल्यातून एक कमळ सप्रेम भेट द्या, असे आवाहन नामदार देवेंद्र फडणवीस यांनी  केले.


काय म्हणाले चंद्रशेखर बावनकुळे


या निवडणुकीमध्ये होळी रंगपंचमी भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर जयंती हनुमान जयंती राम नवमी गुढीपाडवा भाजपा स्थापना दिवस येत असून कार्यकर्त्यांनी मतदारांशी लाभार्थ्यांची संपर्क साधण्यासाठी पक्षाला 40 दिवस द्या, अशी विनंती भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली. यावेळी त्यांनी प्रत्येक विधानसभा निहाय आढावा घेतला व पक्षाने कोणते कोणते काम करावे तसेच 24 महत्त्वाच्या कामासंदर्भात प्रत्येक कार्यकर्त्यांनी जबाबदारीने कामाला लागा ही निवडणूक सोपी नाही तर ही आव्हानात्मक आव्हान स्वीकारून भाजपा कार्यकर्ता हे आव्हान यशस्वीरित्या पार पाडावे, अशी आवाहन भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले. 





यावेळी आमदार रणधीर सावरकर, आमदार प्रकाश भारसाकळे, आमदार हरीश पिंपळे, किशोर पाटील, विजय अग्रवाल, राजेश रावणकर, शाम बडे, बळीराम सिरस्कार यांनी अहवाल प्रस्तुत केले. यावेळी नामदार फडणवीस आणि बावनकुळे यांचे स्वागत भाजपा जिल्हाध्यक्ष किशोर पाटील, जयंत मसने, श्याम बडे यांनी केले. तर उमेदवार अनुप धोत्रे यांनी सुद्धा मान्यवरांचे स्वागत केले. 


अनुप धोत्रे यांचे स्वागत 



यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री आमदार देवेंद्र फडणवीस यांनी व प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिलेदार म्हणून अनुप धोत्रे यांची निवड केल्याबद्दल स्वागत करून शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचा संचालन माजी नगरसेवक भाजपा प्रसिद्धीप्रमुख गिरीश जोशी यांनी तर आभार प्रदर्शन जयंत मसने यांनी केले.




यावेळी माजी मंत्री रणजीत पाटील, माजी खासदार अनंतराव देशमुख, आमदार वसंत खंडेलवाल, माजी आमदार वसंतराव  खोटरे, माजी आमदार विजय जाधव, माजी नगरसेवक तालुका व जिल्हा पदाधिकारी संचलन समिती व अकोला पश्चिमचे इच्छुक उमेदवार उपस्थित होते. यावेळी नामदार देवेंद्र फडणवीस यांचे जोरदार स्वागत करण्यात आले.


टिप्पण्या